Math, asked by shindesneha, 11 months ago


• पुढील वाक्यांचे प्रकार ओळखा : 1)मुलांनो, शिस्तीने वागा.​

Answers

Answered by rajraaz85
2

Answer:

आज्ञार्थी वाक्य

Explanation:

वाक्याचे अनेक प्रकार आहेत त्यातील एक प्रकार म्हणजे आज्ञार्थी वाक्य -

जर वाक्यात वापरलेल्या क्रियापदावरून एखादी आज्ञा होत आहे असे आढळून आल्यास ते वाक्य आज्ञार्थी वाक्य आहे असे समजावे.

व्यक्ती मोठी असो किंवा लहान असो तिला सांगितले एखादे काम म्हणजे आज्ञाच असते.

आज्ञार्थी वाक्याचे आणखीन काही उदाहरणे पाहूया:

१. मुलांनो, पुस्तक काढा.

२. परमेश्वरा, माझ्या इच्छा पूर्ण कर.

३. देवा, मला माफ कर.

४. सुनील, दरवाजा बंद कर.

५. बाजारातून दूध घेऊन ये.

६. लक्ष्मी, चहा ठेव.

७. परमेश्वरा, सगळ्यांना सुखी ठेव.

Similar questions