India Languages, asked by Yashkurhade, 8 days ago

पुढील वाक्यप्रचारचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा

(1)कृतकृत्य होणे
(2)ताव मारणे
(3)धूम ठोकणे

Answers

Answered by rajraaz85
4

Answer:

कृतकृत्य होणे म्हणजे धन्य वाटणे किंवा समाधान वाटणे.

वाक्यात उपयोग-

१. मुलगा मेहनत करून नोकरीला लागल्यामुळे आई-वडिल कृतकृत्य झाले.

२. अथक प्रयत्नानंतर यश मिळाल्यावर अजयला कृतकृत्य वाटले.

ताव मारणे म्हणजे पोटभर खाणे किंवा मनसोक्त खाणे.

वाक्यात उपयोग-

१. शाळेतून घरी आल्यावर विजयने आईने दिलेल्या पदार्थांवर ताव मारला.

२. वाढदिवसाच्या कार्यक्रमाला  आपले आवडते पदार्थ ताटात बघून राजेशने ताव मारला.

धूम ठोकणे म्हणजे पळ काढणे.

वाक्यात उपयोग-

१. पोलिसांच्या गाडीचा आवाज ऐकून चोरांनी धूम ठोकली.

२. रात्री दुकानातील सर्व सामान चोरून लोकांनी धूम ठोकली.

Similar questions