Hindi, asked by gudekarkiran8, 9 days ago

पुढील विषयांवर बातमीलेखन करा. 'ऑलिम्पिक २०२०'​

Answers

Answered by surajparache406
0

Answer:

himalyachi sarvatvlbutarekadi

Answered by bagedivya
2

पुढील विषयांवर बातमीलेखन करा. 'ऑलिम्पिक २०२०'

उत्तर :

टोकियो ऑलिम्पिकला धुमधडाक्यात सुरवात झाली. जगभरातील विविध देशांच्या खेळाडूंची पथके आपला राष्ट्रीय ध्वज घेऊन स्टेडियममध्ये पोहोचली होती. भारतीय खेळाडूंचे पथक ज्यावेळी स्टेडियममध्ये दाखल झाले तेव्हा तमाम भारतीयांचा उत्साह गगनात मावेनासा झाला होता. हॉकी संघाचा कर्णधार मनप्रीत सिंह आणि बॉक्सर मेरी कोम हातात तिरंगा घेऊन भारताचे प्रतिनिधित्व करत होते.संपूर्ण जगभरातील क्रीडा प्रेमी उद्घाटन सोहळ्याचा नजारा पाहण्यासाठी आतुरतेने वाट पाहत बसले होते. डोळे दीपवणारी आतषबाजी कॅमेऱ्यात कैद करण्यासाठीही अनेकजण आसुसलेले होते. ज्या प्रकारे ऑलिम्पिकचं उद्घाटन झालं, ते पाहून टोकियोवासियांनी सर्वांचं मन जिंकलं.स्टेडियमच्या चोहोबाजूंनी आतषबाजी आणि सप्तरंगी रोषणाई होत होती. यामध्ये पूर्ण स्टेडियम न्हाऊन निघालं.

Similar questions