पुढील विषयावर बातमी तयार करा.
रेल्वे प्रवासात जेष्ठ नागरिकांनी सूट घेतली असल्यास जेष्ठ नागरिकांजवळ त्यांचे वय दर्शक ओळखपत्र आवश्यक.
(जेष्ठ नागरिक ओळख पत्र, आधार कार्ड, पॅन कार्ड यापैकी कोणतेही एक)
Answers
Answer:
महाराष्ट्र राज्याची अंदाजित लोकसंख्या 12 कोटी इतकी असून त्यापैकी ज्येष्ठ नागरिकांची अंदाजित संख्या एक कोटी इतकी आहे. कुटूंबात मिळणाऱ्या सोयी सुविधा, आधुनिक उपचार पध्दती, वैद्यकीय सुविधा, राहणीमान, सकस आहार व आरोग्याविषयी जागृती निर्माण झाल्यामूळे आयुर्मानात वाढ होत आहे. ज्येष्ठ नागरिक याचा अर्थ 60 वर्ष पूर्ण केलेला कोणताही पुरुष अथवा स्त्री असा होतो. समाजामध्ये शिक्षणाचे प्रमाण वाढल्याने व रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्यामूळे तरुण वर्ग व्यवसाय, नोकरी निमित्ताने ग्रामीण भागातून शहराकडे व एका शहरातून दुसऱ्या शहराकडे स्थलांतरीत होत आहे. त्यामूळे स्थलांतराच्या वाढत्या प्रमाणाबरोबरच विभक्त कुटूंब पध्दती रुढ होत आहे. छोटे कुटूंब, राहण्यासाठी छोटी जागा, इत्यादी कारणामूळे ज्येष्ठ नागरिकांच्या समस्यांमध्ये वाढ होत आहे. आर्थिक दुर्बलता, कमी वेतन, वाढती महागाई, यामूळेसुध्दा कौटूंबिक समस्यांमध्ये वाढ होत असून त्याचा अप्रत्यक्ष परिणाम ज्येष्ठ नागरिकांच्या पोषण व आरोग्यावर होत आहे. ज्येष्ठ नागरिक हा समाजाचा महत्वपूर्ण घटक असल्याने, ज्येष्ठ नागरिकांचे राहणीमान सुसह्य व्हावे, आरोग्याच्या सोयी सुविधा उपलब्ध व्हाव्यात, त्यांच्या पालन पोषणाची जबाबदारी व ज्येष्ठ नागरिकांचे अधिकार यांची जाणिव समाजाला आणि त्यांच्या पाल्यांना व्हावी, म्हणून केंद्र शासनाने ज्येष्ठ नागरिकांच्या कल्याणासाठी आई वडील, ज्येष्ठ नागरिकांच्या चरितार्थ व कल्याणासाठी अधिनियम, 2007 पारित केला आहे. सदरचा अधिनियम महाराष्ट्र राज्यात दिनांक 1 मार्च, 2009 पासून लागू करण्यात आला आहे. (अधिसुचना दिनांक 31 मार्च, 2009)
Explanation: