२.
पुढील विधाने चूक की बरोबर ते सकारण स्पष्ट करा.
(१) भारतीय लोकशाही जगातील सर्वांत मोठी लोकशाही
मानली जाते.
(२) माहितीच्या अधिकारामुळे शासनाच्या कारभारातील
गोपनीयता वाढली आहे.
(३) संविधानाचे स्वरूप एखादया जिवंत दस्तऐवजाप्रमाणे
असते.
Answers
Answer:
सर्व बरोबर. ❤️.
Answer:
Explanation:
1. भारतीय लोकशाही जगातील सर्वांत मोठी लोकशाही मानली जाते.
उत्तर :
हे विधान बरोबर आहे; कारण
i) भारतीय संविधानाने स्वातंत्र्यपूर्व काळातील मतदानाच्या अधिकारासाठी असणारी सर्व बंधने रद्द केल्यामुळे मतदारांची संख्या वाढली आहे.
ii) संविधानाने स्वीकारलेल्या प्रौढ मताधिकाराच्या तरतुदीमुळे सर्व प्रौढ स्त्री-पुरुषांना मतदानाचा अधिकार प्राप्त झाला आहे.
iii) सुरुवातीस मताधिकारासाठी असणारी २१ वर्षांची अट १८ वर्ष पूर्ण अशी केल्यामुळे मताधिकार अधिक व्यापक झाला. मतदारांची एवढी संख्या जगातील कोणत्याच लोकशाही देशात नाही; म्हणून भारतीय लोकशाही ही जगातील सर्वांत मोठी लोकशाही मानली जाते.
2. माहितीच्या अधिकारामुळे शासनाच्या कारभारातील गोपनीयता वाढली आहे.
उत्तर :
हे विधान चूक आहे; कारण
i) लोकशाही अधिक सुदृढ होण्यासाठी आणि नागरिक व शासन यांचा परस्परांवरील विश्वास वाढण्यासाठी शासन काय करीत आहे, हे नागरिकांना माहीत असणे आवश्यक असते.
ii) पारदर्शकता आणि उत्तरदायित्व ही चांगल्या शासनाची वैशिष्ट्ये या अधिकारामुळे प्रत्यक्षात येतात.
iii) शासनाचे व्यवहार अधिक खुले होण्यास या अधिकारामुळे मदत झाली; म्हणून माहितीच्या अधिकारामुळे शासनाच्या कारभारातील गोपनीयता कमी झाली आहे.
3. संविधानाचे स्वरूप एखादया जिवंत दस्तऐवजाप्रमाणे असते.
उत्तर :
हे विधान बरोबर आहे; कारण
i) संविधान हे लिखित स्वरूपात असले तरी ते ग्रंथात बंद झालेले नसून ते प्रवाही असते.
ii) संविधानात बदलत्या परिस्थितीनुसार बदल करण्याचा अधिकार संसदेला असतो.
iii) संविधानाच्या मूलभूत चौकटीला धक्का न लावता जनतेच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी संसद असे बदल करू शकते. संविधानाच्या या प्रवाही गुणधर्मामुळेच त्याचे स्वरूप एखादया जिवंत दस्तऐवजाप्रमाणे असते.