पुढील विधान सकारण स्पष्ट करा
Answers
Question -1:
अ) सर्व प्रसारमाध्यमांत दूरदर्शन अतिशय लोकप्रिय माध्यम आहे.
- दूरदर्शन हे दृक्-श्राव्य माध्यम असल्याने ऐकत असलेल्या माहितीबरोबरच त्यासंबंधीची चलत्चित्र प्रेक्षकांना प्रत्यक्ष पाहायला मिळतात. दूरदर्शन म्हणजे मनोरंजनाचा खजिनाच होय,
- सामाजिक समस्या, शैक्षणिक, आर्थिक चर्चा, राजकीय घडामोडी, चित्रपट, खेळ अशा जगातील सर्व घडामोडी दूरदर्शनच्या छोट्या पडद्यावर घरच्या घरी बसून पाहायला मिळतात.
- खेळाडू, नेते, किल्ले, युद्ध इत्यादी गोष्टींवरील माहितीपट दूरदर्शनवर पाहायला मिळतात.
- दूरदर्शन हे दृक्-श्राव्य माध्यम असल्यामुळे जनतेला 'प्रत्यक्ष काय घडले' हे पाहता येऊ लागले.
- परिणामी, वर्तमानपत्र आणि आकाशवाणी या प्रसारमाध्यमांच्या मर्यादा दूरदर्शनने ओलांडल्या.
- आज दूरदर्शनवर १०० हून अधिक वाहिन्या उपलब्ध असून नॅशनल जिऑग्राफी, हिस्टरी, डिस्कव्हरी यांसारख्या वाहिन्यांद्वारे जगाचा इतिहास, भूगोल, अगदी घरबसल्या जाणून घेणे शक्य झाले आहे.
- शिवाय, विविध पौराणिक व ऐतिहासिक मालिकांनी प्रेक्षकांना खिळवून ठेवले.
वरील सर्व गोष्टींमुळे सर्व प्रसारमाध्यमांत दूरदर्शन सर्वांत लोकप्रिय माध्यम आहे.
Question -2:
अ) इतिहासाच्या साधनांचे जतन व्हावे यासाठी किमान १० उपाय सुचवा.
इतिहासाच्या साधनांत लिखित, भौतिक आणि मौखिक साधने यांचा समावेश होतो. या साधनांचे वेगवेगळ्या पद्धतीने जतन करावे लागते. त्यासाठी माझ्या मते पुढील उपाययोजना कराव्यात:
- या सर्व साधनांच्या जतनासाठी अनुभवी तज्ज्ञ मंडळींचे सल्ले घ्यावेत.
- ऐतिहासिक साधनांच्या जतनासाठी कडक कायदे करावेत.
- या साधनांचे महत्त्व समाजाला पटवून देण्यासाठी विविध उपक्रम हाती घेऊन समाजाचे प्रबोधन करावे.
- या साधनांविषयी, प्राचीन इतिहासाविषयी जनतेच्या मनात आपलकी निर्माण केली पाहिजे. हा आपला प्राचीन वारसा आहे, त्याचे महत्त्व पटवून देऊन त्याविषयी त्यांच्या मनात गोडी निर्माण करावी.
- ऐतिहासिक साधनांच्या जतनात सामान्य जनतेला मोठ्या प्रमाणात सामील करून घ्यायला हवे. तसे उपक्रम हाती घ्यायला हवेत.
Question -3:
अ) वंचितांचा इतिहास
- समाजाने ज्यांना सर्व अधिकारांपासून वंचित ठेवले, उपेक्षित ठेवले; अशा समूहांच्या इतिहासाला 'वंचितांचा इतिहास'असे म्हणतात.
- मार्क्सवादी इतिहासलेखनाच्या परंपरेतून वंचितांचा इतिहास लिहिण्याची परंपरा सुरू झाली.
- इटालियन तत्त्वज्ञ अँटोनिओ ग्रामची याने इतिहासलेखनाची सुरुवात समाजाच्या तळाशी असलेल्या सर्वसामान्य लोकांपासून करण्याची कल्पना मांडली.
- भारतात महात्मा फुले व डॉ. आंबेडकर यांच्या लेखनात वंचितांच्या इतिहासाचा विचार दिसून येतो. लोकपरंपरा हे वंचितांच्या इतिहासलेखनाचे एक महत्त्वाचे साधन मानले जाते. वंचितांच्या इतिहासातून सर्वसामान्य माणसाच्या जीवनाचे चित्रण केले गेले.
Question -4:
अ) निवडणूक आयोगाची कार्ये स्पष्ट करा.
निवडणूक आयोग पुढील कार्ये करतो-
- मतदार याद्या तयार करण्याचे व त्या अद्ययावत करण्याचे काम करणे.
- निवडणुकांचे वेळापत्रक आणि निवडणुकीची प्रक्रिया यांचे नियोजन करणे.
- उमेदवारांच्या अर्जाची छाननी करणे.
- निवडणुका घेणे व त्यासंबंधीची सर्व कामे करणे.
- राजकीय पक्षांना मान्यता देणे वा मान्यता रद्द करणे.
- निवडणुकीसंबंधातील सर्व वाद वा तक्रारींचे निवारण करणे.
(or)
भारतातील निवडणूक प्रक्रियेच्या केंद्रस्थानी भारताचा निवडणूक आयोग आहे. निवडणूक प्रक्रिया खुली, न्याय्य आणि विश्वासार्ह व्हावी यासाठी भारतीय संविधानाच्या कलम ३२४ नुसार या स्वायत्त यंत्रणेची निर्मिती करण्यात आली आहे.
निवडणूक आयोगाची कार्ये पुढीलप्रमाणे आहेत:
१. मतदारयाद्या तयार करणे
मतदारांच्या याद्या तयार करणे, त्या अद्ययावत करणे, मतदारयादीत नव्या मतदारांचा समावेश करणे, मतदारांना ओळखपत्र देणे.
२. वेळापत्रक व संपूर्ण कार्यक्रम ठरवणे
निवडणुकांचे संपूर्ण संचालन ही निवडणूक आयोगाची जबाबदारी आहे. त्यासाठी कोणत्या राज्यात, केव्हा व किती टप्प्यांत निवडणुका घेता येतील याचे वेळापत्रक व संपूर्ण कार्यक्रम निश्चित करणे.
३. उमेदवारांच्या अर्जांची छाननी
निवडणुकांच्या तारखा जाहिर झाल्यानंतर निवडणूक लढवण्यासाठी उभे राहिलेल्या विविध राजकीय पक्षांचे उमेदवार व कोणत्याही पक्षाचा पाठिंबा न घेता स्वतंत्रपणे निवडणूक लढवणारे अपक्ष उमेदवार यांच्या उमेदवारी अर्जांची काटेकोर छाननी करणे, पात्र उमेदवारांना निवडणूक लढवण्याची परवानगी देणे.
४. राजकीय पक्षांना मान्यता देणे
भारतात बहुपक्षपद्धती आहे. सर्व पक्षांना निवडणूक आयोगाची मान्यता आवश्यक असते. त्यामुळे, विविध राजकीय पक्षांना निवडणूक लढवण्याची मान्यता देणे किंवा त्यांची मान्यता रद्द करणे व राजकीय पक्षांना निवडणूक चिन्ह देणे.
५. निवडणुकीसंबंधी वाद सोडवणे
निवडणुकीसंबंधी काही वाद निर्माण झाल्यास ते सोडवणे, त्यानुसार एखाद्या मतदारसंघात पुन्हा निवडणुका घेणे, उमेदवाराची अपात्रता घोषित करणे.
Question -5:
अ) मतदारसंघाची पुनर्रचना
- लोकसभेची एकूण सदस्यसंख्या ५४३ आहे.
- प्रत्येक सभासद एका मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतो. म्हणजेच, लोकसभेचे एकूण ५४३ मतदारसंघ आहेत.
- विधानसभा आणि लोकसभा यांच्या निवडणुकांसाठी मतदारसंघ निर्माण करण्याचे काम निवडणूक आयोगाचे असते.
- निवडणूक आयोगाने सुरुवातीच्या काळात हे मतदारसंघ निश्चित केले. परंतु काळाच्या ओघात उद्योग-व्यवसायाच्या निमित्ताने मोठ्या प्रमाणात स्थलांतर झाले आहे.
- खेड्यांतून शहरांकडे हे स्थलांतर झाल्याने एखाद्या मतदारसंघातील मतदारांची संख्या घटते तर अन्य काही ठिकाणी ती प्रचंड वाढते. यामुळे मतदारसंघ संतुलित राहत नाहीत. म्हणून मतदारसंघांची पुनर्रचना करावी लागते.
- हे मतदारसंघ निर्माण करण्याचे वा त्यांची पुनर्रचना करण्याचे काम निवडणूक आयोगाची परिसीमन समिती करते.
- ही परिसीमन समिती कोणत्याही दबावाखाली न येता तटस्थपणे मतदारसंघाची पुनर्रचना करते.