History, asked by spatil88378, 9 months ago

पूढील विधाने सकारण स्पष्ट करा (कोणतेही एक)
२) बखर हा ऐतिहासिक साहित्यातील महत्त्वाचा प्रकार आहे.
३) फुका यांच्या लेखनपधीतीला ज्ञानाचे पुरातत्त्व म्हटले आहे
पढील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा (कोणतेही एक)​

Answers

Answered by rajatmeshram068
4

Answer:

प्रश्न2.

बखर हा ऐतिहासिक साहित्यातील महत्त्वाचा प्रकार आहे.

उत्तर

i) ऐतिहासिक साहित्यात फारसी ग्रंथ, ताम्र-शिलालेख कागदपत्रे, नाणी, प्रवासवर्णने इत्यादी साधनांबरोबर ऐतिहासिक बखरींचाही समावेश होतो.

ii) बखरीत शूर योद्ध्यांचे गुणगान असते. ऐतिहासिक घडामोडी आणि युद्धांची वर्णने असतात.

iii) थोर पुरुषांची चरित्रे आणि त्या काळातील नगरांची वर्णने असतात.

iv) तत्कालीन सामाजिक, धार्मिक आणि आर्थिक जीवनाचे चित्र रंगवलेले असते. वर्णने इतिहासलेखनाला उपयुक्त ठरतात; म्हणून 'बखर' हा ऐतिहासिक साहित्यातील महत्त्वाचा प्रकार आहे.

Similar questions