३. पुढील विधाने सकारण स्पष्ट करा. (१) स्त्रियांच्या आयुष्याशी निगडित विविध पैलूंवर विचार करणारे संशोधन सुरू झाले. (२) फुको यांच्या लेखनपद्धतीला ज्ञानाचे पुरातत्त्व म्हटले आहे.
Answers
Answer:
3
1) उत्तर:- स्त्रीवादी इतिहास लेखन म्हणजे स्त्रियांच्या दृष्टिकोनातून केलेली इतिहासाची पुनर्रचना.सीमा-द-बोवहा या फ्रेंच विदुषीने स्त्रीवादी ची मूलभूत भूमिका सिद्ध केली. स्त्रीवादी इतिहास लेखन यामध्ये स्त्रियांच्या अंतर्भाव करण्याबरोबर इतिहास लेखनाच्या क्षेत्रातील पुरुष प्रधान दृष्टीकोनाचा पुनर्विचार करण्यावर भर दिला गेला. त्यानंतर स्त्रियांच्या आयुष्याशी निगडित नोकरी, रोजगार, ट्रेड युनियन, यांच्या साठी काम करणाऱ्या संस्था, स्त्रियांचे कौटुंबिक आयुष्य यासारख्या विविध पैलूंचा सविस्तर विचार करणारे संशोधन सुरू झाले.
२) उत्तर:- इतिहासाची कालक्रमानुसार अखंड मांडणी करण्याची पद्धत चुकीची आहे, असे प्रतिपादन केले. पुरतत्त्वा मध्ये अंतिम सत्यापर्यंत पोहोचणे हे उद्दिष्ट नसून भूतकाळातील स्थित्यंतरांचे स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न असतो त्यांच्याकडे लक्ष वेधले. फुको यांनी इतिहासातील स्थित्यंतरांचे स्पष्टीकरण यावर भर दिला. म्हणून त्यांनी त्या पद्धतीला ज्ञानाचे पुरातत्व असे म्हटले.
Answer:
आसमंतात घडलेल्या आवाजाच्या संमेलन वर्णन तुमच्या शब्दात करा