Social Sciences, asked by madhuryagowd4841, 1 year ago

पुढीलपैकी चुकीची जोडी ओळखा व लिहा.
व्यक्ती विशेष
जाल कूपर - टपाल तिकिट अभ्यासक
कुसुमाग्रज - कवी
अण्णाभाऊ साठे - लोकशाहीर
अमर शेख - चित्रसंग्राहक

Answers

Answered by ajaybh3103
25

अमर शेख - मराठी लोकशाहीर

२० ऑक्टोबर १९१६ रोजी अमर शेख म्हणजेच  मेहबूब हुसेन पटेल यांचा जन्म झाला होता. मराठी साहित्याचा आईकडून मिळणारा वारसा आणि सुंदर व भरीव असा अमर यांचा आवाज  जणू  निसर्गाची देणगी होती. त्यांनी बस क्लीनर , गिरणी कामगार अशी कामे देखील त्यांच्या तरुण वयात केली . त्यांनी गिरणी कामगारांच्या संपात, गोवा मुक्ती आंदोलनात आपला मोलाचा सहभाग नोंदवला होत्या. मात्र समाजाच्या उद्धार करण्यासाठी त्यांनी आपली लेखनी निवडली आणि शाहीरीचा मार्ग धरला त्यांचा साहित्यात लावणी, पोवाडे, गीते, लोकनाट्ये इत्यादींचा समावेश होता. कलश (१९५८) आणि धरतीमाता (१९६३) हे त्यांनी लिहिलेले काव्यसंग्रह आहेत . अमरगीत (१९५१)  आणि पहिला बळी (१९५१) हेत्यांचे नाटक आणि काव्यसंग्रह आहेत. त्यांच्या पोवाड्यांत छ. शिवाजी महाराज, होळकर आणि उधमसिंग यांची कारकीर्द आपल्याला ठळकपणे मांडलेली दिसते.

Answered by gadakhsanket
32

उत्तर

व्यक्ती। विशेष

जाल कूपर - टपाल तिकिट अभ्यासक कुसुमाग्रज - कवी अण्णाभाऊ साठे - लोकशाहीर अमर शेख - चित्रसंग्राहक

यातील चुकीची जोडी

अमर शेख - चित्रसंग्राहक

दुरुस्त केलेली योग्य जोडी

अमरशेख - शाहीर

जाल कूपर हे 'टपाल तिकीट'या विषयातले जागतिक पातळीवरचे अभ्यासक होते.१९७७

मध्ये भारत सरकारने जल कूपर हे टपाल तिकीट प्रसिद्ध केले.

कुसुमाग्रज या कवींनी 'आवाहन' भारत चीन युद्धाच्या परिस्थितीवर रचलेली कविता आहे.

धन्यवाद...

Similar questions