India Languages, asked by anushapilaram896, 4 months ago

पुढीलपैकी कोणत्याही दोन वाक्प्रचारांचा अर्थ सांगून वाक्यांत उपयोग करा : (१) दातओठ खाणे (२) थैमान घालणे (३) नक्षा उतरवणे (४) मागमूस नसणे.​

Answers

Answered by landage1974
7

Answer:

1 दातओठ खाणे -

राग येणे

राम सारखा दातओ खात होता

2 थैमान घालणे -

दंगा करणे

राम वर्गात खूप थैमान घालत असे

3 नक्षा उतरवणे -

I don't know

4 मागमूस नसणे -

पत्ता नसणे

रामचा २ दिवस मागमूस नव्हता.

Answered by rajraaz85
5

Answer:

दात ओठ खाणे

अर्थ -खुप राग येणे

वाक्यात उपयोग-

१. नवीन आलेल्या सुनेचे खूप लाड पुरवले जात असल्यामुळे घरातील मोठी सून दात ओठ खात होती.

२. आपल्यापेक्षा नवीन आलेल्या मुलाला जास्त पगार दिल्यामुळे विजय त्याच्यावर दात-ओठ खात होता.

थैमान घालणे-

अर्थ -आदळआपट करणे किंवा आरडाओरडा करणे.

१. परीक्षेत अपेक्षित यश न मिळाल्यामुळे रामने घरातच थैमान घातले.

२. वाढदिवसाला अजयची इच्छा पूर्ण न झाल्यामुळे त्याने थैमान घातले.

नक्षा उतरवणे-

अर्थ- एखाद्याचा अभिमान उतरवणे किंवा ताठा कमी करणे.

वाक्यात उपयोग-

१. वर्गातील सर्व विद्यार्थ्यांसमोरच शिक्षकांनी अजयचा नक्षा उतरवला.

२. सुरजचा निकाल पाहिल्यानंतर घरात आल्या आल्या वडिलांनी सुरजचा नक्षा उतरवला.

मागमूस नसणे-

अर्थ- एखाद्या गोष्टीची थोडीही कल्पना नसणे, माहिती नसणे.

वाक्यात उपयोग-

१. राकेश ने नवीन घर घेतले पण घरातील व्यक्तींना त्याचा मागमूसही नव्हता.

२. शाळेतच मुलांनी वाढदिवसाच्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते पण तरीही शिक्षकांना त्याचा मागमूस लागू दिला नाही.

Similar questions