:
पुढीलपैकी कोणत्या कायदयाद्वारे महिलांना त्यांचे स्वातंत्र्य जपण्यासाठी आणि स्वत:चा विकास
साधण्यासाठी अनुकूल वातावरण निर्माण केले आहे? -...
(अ) माहितीचा अधिकार कायदा (ब) हुंडा प्रतिबंधक कायदा
(क) अन्नसुरक्षा कायदा (ड) यांपैकी कोणताही नाही
Answers
Answer:
(ब) ...........
Explanation:
option (ब) is your answer
Answer:
ब) हुंडा प्रतिबंधक कायद्याद्वारे महिलांना त्यांचे स्वातंत्र्य जपण्यासाठी आणि स्वतःचा विकास साधण्यासाठी अनुकूल वातावरण निर्माण झाले आहे.
Explanation:
१. महिलांमधील निरक्षरता दूर करून त्यांना सक्षम करणे, त्यांना विकासाच्या संधी उपलब्ध करून देणे या हेतूने महिलांसाठी संविधानाने कायदे केले आहेत.
२. त्यांपैकीच 'हुंडा प्रतिबंधक कायदा' हा एक कायदा आहे.
३. पूर्वी एखाद्या स्त्रीचा विवाह झाल्यावर तिच्या सासरकडील लोक हुंडा मागत असत.
४. काही जण पैसे मागत असत, तर काही वाहने मागत असत.
५. अशा मानसिक व शारीरिक त्रासामुळे कित्येक महिला जीवनाला कंटाळून आत्महत्या करत असत.
६. त्यामुळे महिलांना संरक्षण देण्यासाठी व त्यांना विकास साधण्यासाठी 'हुंडा प्रतिबंधक कायदा' करण्यात आला.
७. महिला आता स्वतःच्या पायावर उभ्या राहत आहेत. त्या स्वतःचा विकास करत आहेत.
म्हणूनच,
ब) हुंडा प्रतिबंधक कायद्याद्वारे महिलांना त्यांचे स्वातंत्र्य जपण्यासाठी आणि स्वतःचा विकास साधण्यासाठी अनुकूल वातावरण निर्माण झाले आहे.
काही महिलांसंबंधीचे कायदे:
१. वडिलांच्या व पतीच्या संपत्तीत समान वाटा.
२. हुंडा प्रतिबंधक कायदा.
३. लैंगिक अत्याचारापासून संरक्षण देणारा कायदा.
४. घरघुती हिंसाचार प्रतिबंधक कायदा.