पुढीलपैकी प्रत्येक गटातील चुकीची जोडी
ओळखून लिहा.
i) हर्षचरित
बाणभट्ट
i) राजतरंगिणी कल्हण
i) अकबरनामा अबुल फजल
) तारीख फिरोज शाह अमीर खुश्रू अमीर
Answers
Answer:
माझी शाळा यावर निबंध -
" नमस्कार माझा ह्या ज्ञानमंदिरा... सत्यम् शिवम् सुंदरा "
खरोखरच प्रत्येक लहान मुलाच्या आयुष्यात शाळा ही खूप मोठी भूमिका बजावते कारण शाळेत जाण्यापूर्वी ते मुल घरातल्या छोट्याशा जगात असते. त्याचा बाहेरील मोठ्या जगाशी परिचय होतो तो शाळेमुळेच होतो, म्हणूनच शाळेचे महत्व लहान मुलच्या जीवनात फार असते.
माझी शाळा आमच्या घराजवळच आहे, शाळेत चालत जाण्यास बरोबर बारा मिनिटे लागतात. ही बारा मिनिटे मी जणू काही वा-यावर उडतच पार करतो. परंतु कधी उशीर झाला की बस मधे जव लागत.माझे कित्येक मित्र दूरवरून आमच्या शाळेत येतात आणि त्यांना शाळेच्या बसने यावे लागते. त्यामुळे त्यांना माझा हेवा वाटतो.
आमच्या शाळेत शिस्तीचे महत्व फार आहे, शाळेची पहिली घंटा होते तेव्हा सर्व मुले शाळेच्या फाटकाच्या आत आलेली असली पाहिजेत, दुसरी घंटा होते तेव्हा आपापल्या वर्गात गेली पाहिजेत आणि तिस-या घंटेला प्रार्थना सुरू झाली पाहिजे असा आमच्या मुख्यराध्यापकांचा आग्रह असतो.
आमचे सर्व शिक्षक खूप मनमिळाऊ असून वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये भागघेण्यास ते आम्हाला खूप प्रोत्साहन देतात. आमच्यासाठी खास खोखोचे प्रशिक्षणसुद्धाशाळेत चालते. मी स्वतः खोखोच्या संघात असून गेल्या वर्षी आम्हाला आंतरशालिय ढाल मिळाली होती. त्याशिवाय उन्हाळी सुट्टीत आमच्यासाठी पोहण्याची खासशिबिरे आयोजित केली जातात, आमच्या लहानमोठ्या सहली काढल्या जातात. मी दर वर्षी शाळेच्या सहलीला जातो. आईबाबांसोबत सहलीला जाणे आणि बरोबरीच्या मित्रांसोबत शाळेच्या सहलीला जाणे ह्यात खूप फरक आहे. मात्र शाळेच्या सहलीत फार मस्ती करून चालत नाही. मुले एकदा चेकाळली की कुणाचेच ऐकत नाहीत असा आमच्या सरांचा अनुभव आहे.
ह्या शाळेत मी आहे हे माझे मोठे भाग्य आहे असे मला वाटते कारण इथेच मला खुप चांगले मित्र मिळाले. आमच्या शाळेचे ग्रंथसंग्रहालय आणि प्रयोगशाळाही अगदी अद्ययावत आहेत. म्हणूनचमला माझी शाळा खूप आवडते.