पुढारी या दिवाळी अंक मागणी पत्र लेखन मराठी
Answers
Answer:
कृष्णाकाठ दिवाळी अंक 2020 सांगलीतून प्रसिद्ध होणाऱ्या कृष्णाकाठ दिवाळी अंकाचे यंदा 38 वे वर्ष आहे. या अंकात अनेक उत्तम लेख प्रसिद्ध झाले आहेत.हा अंक पीडीएफ स्वरूपात समाज माध्यमावर उपलब्ध असून वाचकांनी त्याचा मोठ्या संख्येने प्रसार केला आहे.फक्त दिवाळीच्या पाच दिवसात वाचून संपवावा असा हा अंक नसून एक संग्राह्य असा अंक आहे.
शब्दशिवार दिवाळी अंक 2020 मंगळवेढा जिल्हा सोलापूर येथून प्रकाशित होणाऱ्या या दिवाळी अंकाचे हे सातवी वर्ष असून अंकाच्या संपादक एडवोकेट कुमुदिनी सिद्धेश्वर घुले या असून अंकाचे सहाय्यक संपादक प्राध्यापक नारायण घुले हे असून सहाय्यक संपादक तनुजा हा अंक ई-बुक स्वरूपात देखील उपलब्ध आहे अंकामध्ये अनेक मान्यवरांच्या वैविध्यपूर्ण लेखनाचा समावेश असून अत्यंत संग्राह्य अंक आहे. ★ चिरांगन वऱ्हाडी अंक गेल्या तीन वर्षापासून अखिल भारतीय मराठी साहित्य मंच अकोला यांच्यातर्फे प्रकाशित करण्यात येतो 2020 हे अंकाचे तिसरे वर्ष आहे. अस्सल वऱ्हाडी बोलीभाषेतील हा दिवाळी अंक आहे. बोली भाषेतील दर्जेदार लेखकांच्या साहित्याचा यात समावेश असतो. या दिवाळी अंकाचे मुख्य संपादक श्री श्याम ठक सह संपादक निलेश कवडे आणि कार्यकारी संपादक सुप्रसिद्ध युवा कादंबरीकार पुष्पराज गावंडे आहेत ★ गझल अमृत दिवाळी अंक २०२० गझल मंथन साहित्य संस्था कोरपना जिल्हा चंद्रपूर यांच्या वतीने गझल अमृत दिवाळी अंकाचे प्रकाशन केल्या जाते. संपूर्ण गझल विधेला वाहिलेला हा दिवाळी अंक असून या अंकामध्ये महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध गझलकारांच्या गझल आणि गझल विषयक चिंतनात्मक लेखांचा समावेश आहे. या दिवाळी अंकाचे संपादक जयवंत वानखडे असून गझल मंथन साहित्य संस्थेचे अध्यक्ष अनिल कांबळे हे आहेत