Art, asked by Pravin1221, 18 days ago

पुढे दिलेल्या काव्यपंक्ती चे रसग्रहण करा तुझे शब्द जसे की महाकाव्य तुझ्या पाया जवळ गळून पडावीत तुझा संघर्ष साकी काठयाचा संगिनी व्हाव्यात​

Answers

Answered by shankarbhosale171976
5

Answer:

आशयसौंदर्य :

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी प्रस्थापित वर्णव्यवस्थेविरुद्ध महाड येथे चवदार तळ्याचा जो संग्राम केला व शोषितांवरील अन्यायाविरुद्ध लढा उभारला, त्याच्या पन्नास वर्षे पूर्तीनंतर कवी ज. वि. पवार यांनी 'तू झालास मूक समाजाचा नायक ' या कवितेमध्ये आपले मनोगत व्यक्त केले आहे. समाजाच्या या महानायकाला अभिवादन करताना त्याच्या कार्याचा यथोचित गौरव केला आहे .

काव्यसौंदर्य :

उपरोक्त ओळींमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या शब्दांची किमया आणि संघर्षाचा परिणाम यांची महती कथन केली आहे. चवदार तळ्यावर सर्वांसाठी पाणी खुले करताना महामानवाने जी घोषणा केली त्या शब्दांत पुढे सर्व महाकाव्य नतमस्तक व्हावीत अशी होती . तसेच जो संघर्ष केला प्रभाव असा पडला की शोषितांच्या हातातल्या काठ्या जणू जहाल बंदुका झाल्या डॉ. बाबासाहेबांचा शब्द व संघर्षाचे सामर्थ्य यातून व्यक्त होते .

भाषिक वैशिष्ट्ये :

मुक्तछंदात ( मुक्तशैली )लिहिलेली ही कविता, त्यातील ओजस्वी शब्दकळे मुळे कार्यकर्त्यांच्या काळजाला थेट भिडते. काव्यात्म पण थेट विधानांमुळे त्यातील विचार परिणामकारक झाले आहेत. ' महाकाव्याची नम्रता ' व ' काठ्यांचा बंदुका ' या प्रत्येकी शांतरस व अद्भुतरस यांची निर्मिती करतात.

Similar questions