India Languages, asked by lotussujith6817, 1 year ago

पिंजरातील पोपटाचे मनोगत यावर निबंध

Answers

Answered by gadakhsanket
469
नमस्कार मित्रा,

● पिंजऱ्यातील पोपटाचे मनोगत-
नमस्कार, मी पोपट बोलतोय. हा तोच मिठु-मिठु बोलणारा.

मी आज तुम्हाला माझ्या आयुष्याबद्दल सांगणार आहे. माझा जन्म एका मोठ्या जंगलात झाला. एका पर्यटकाला मी आवडलो मग त्याने मला त्याच्या घरी नेलं. त्याने माझ्यासाठी नवीन पिंजरा बनवला. माझा मालक मला खायला देतो. त्याने मला मराठी बोलायला पण शिकवलंय.

पण शेवटी पिंजरा ही कैदच. येथे ऐश कितीही असली तरी स्वातंत्र्य नाही. खायला किती असलं तरी तो निसर्ग नाही. कंटाळलोय मी या बंधनाला.

आता मी म्हातारा झालोय काही. जास्त बोलता येत नाही. त्यामुले मी मालकाचे मनोरंजन करू शकत नाही. तर आता मला टाकून देण्यात येईल. कसायाला मी विकला जाईल.

शेवटी एकाच इच्छा आहे इथून पुफहच राहिलेले आयुष्य हे पिंजऱ्याशिवाय मोकळ्या निसर्गात असावं.

चला निघतो मी. धन्यवाद.
Answered by viviandsouza2002
30

मित्रा मी पिंजऱ्यातला पोपट बोलतो आहे. मी या पिंजऱ्यात दुःखकष्टी जीवन जगत आहे. आता मला हे जीवन नकोसे झाले आहे. काय हे माझे भाग्य ! मला स्वप्नातदेखील असा विचार आला नाही की, मला पिंजऱ्यात बंदिस्त व्हावे लागेल. या पिंजऱ्यात मला मधुर फळे खायला मिळतात. घरातील सर्वजण माझा कौतुक करतात. पण मला पिंजऱ्यातून कोणीही बाहेर काढत नाही. आजही मला माझे पूर्वीचे स्वातंत्र्याचे दिवस आठवतात आणि असे हरवून गेलेले आनंदाचे क्षण परत माझ्या जीवनात कधी येणार, या विचाराने माझे मन व्याकुळ होते.

बालपणी मी किती सुखात होतो ! अतिशय निसर्गरम्य असे ते जंगल होते. त्या जंगलातील एका झाडावरील ढोलीत माझा जन्म झाला. त्या ढोलीतून मी प्रथम बाहेर पाहिले तेव्हा आसपासचे नयनरम्य देखावा पाहून मला किती आनंद झाला होता ! पुढे माझ्या पंखात बळ आल्यावर माझ्या आईवडिलांनी मला निळ्या आकाशात उडायला शिकविले. जंगलातील झाडांवर मी आईवडिलांसमवेत स्वछंद विहार करीत असे.कधी या झाडावर तर कधी त्या झाडावर. दिवस उजाडला की मी बाहेर पडत असे. आईवडिलांबरोबर राहिल्यावर मी समवयस्क मित्रांबरोबर रामू लागलो. त्या वेळी तासन्तास जगातल्या सर्व दुःखांपासून दूर आकाशात फिरायचो. मी माझे पंख पसरवून अशी काही भरारी आकाशात घायचो जाणू काही मीच इथला ' राजा ' आहे. झाडांच्या डहाळ्यांवर खेळायचो, बगाडायचो. मधुर गाणी गायचो शेतातील धान्याच्या कणसातील दाणे टिपायचो. जंगलातील झाडांची फळ मनसोक्त खायचो. विशषतः पेरूच्या झाडांची ! मग हिरव्यागार झाडांच्या सानिध्यात गाढ झोपायचो. रात्रीच्या वेळी झोप आली नाही तर आकाशातील चंद्र व चांदण्या यांचा लपंडाव पाहत राहायचो. असे होते ते मस्त जीवन ! पण माझ्या वाट्याला फारच थोडे दिवस ते सुख आले.

एके दिवशी मी जमिनीवरील दाणे टिपत असताना कसा कोण जाणे माझा पाय जाळ्यात अडकला. मी ओरडू लागलो ; पण माझे सोबती माझ्या मदतीला न येता उडून गेले. मी फासेपारध्याचा हाती सापडलो. त्याच्याजवळ इतरही पुष्कळ पक्षी होते फासेपारड्याने मला एका श्रीमंत माणसाच्या हाती विकले. माझ्या सुंदरतेवर खुश होऊन त्या श्रीमंत माणसाने फासेपारड्याला भरपूर पैसे दिले.

तेव्हा पासून मी गुलामगिरीचे जीवन जगतोय. माझ्या मालकाने मला सोनेरी पिंजऱ्यात बंदिस्त केले आहे त्याने दिलेली फळे गोड मानून खातो. लहान मुले मला खेळणं समझून माझ्या सभोवती घेराव घालतात आणि काही ना काही खाऊ घालण्याचा प्रयत्न करतात. स्वातंत्र्य हिरावून घेतलायचं दुःख त्यांना काय समजणार !

Explanation:

Mark me as brainliast

Similar questions