India Languages, asked by AyushArolkar, 11 months ago

पिंजऱ्यातील पोपटाचे मनोगत मराठी

Answers

Answered by halamadrid
17

■■पिंजऱ्यातील पोपटाचे मनोगत■■

नमस्कार, मुलांंनो मी पोपट बोलत आहे.मला असे पिंजऱ्यात बघून तुम्हाला वाटत असेल की,मी खूप आनंदात आहे.मला इथे आराम करायला मिळते,खायला मिळते.मला काही कष्ट करावे लागत नाही.पण,मी सुखात नाही.

मी एकदा रानात हिंडत होतो.एका शिकाऱ्याने मला त्याच्या जाळ्यात अडकवले.नंतर बाजारात विकले.तेव्हापासून, मी येथे आहे.

पूर्वी,मी रानात मुक्तपणे हिंडायचो.कोणत्याही झाडावर बसायचो.केव्हाही आकाशात उंच उडायचो.मला हवे तिथे मी जायचो.पण, आज मी पूर्ण परतंत्र आहे.

मलासुद्धा तुमच्यासारखे खेळावेसे वाटते.माझ्या कुटुंबासोबत,मित्रांबरोबर हसावेसे,खेळावेसे वाटते.पण काय करणार?तुम्ही मात्र एक गोष्ट लक्षात ठेवा.पक्ष्यांना असे कधीच पिंजऱ्यात कोंडून ठेवू नका.

Similar questions