पंक्चर सायकलचे मनोगत short essay in marathi
Answers
Answer:
मी पंक्चर सायकल बोलतेय...!
Explanation:
अरे, ए! काय करतोस? माझ्या अंगावर हे पाणी का टाकत आहेस? इकडेतिकडे काय पाहतोस? मी तुझी पंक्चर सायकल बोलतेय!
मी खूप दिवसांपासून अशीच पडलेली आहे. माझ्याकडे कोणी ढुंकूनही पाहत नाही. मी किती वर्षं तुझी साथ दिली आहे! आणि तू मला असे एकटं पाडलंस.
तू लहान होतास तेव्हा तुझी लहान सायकल, माझी लहान बहीण आमच्या दुकानावर आली आणि मग मी तुमच्या घरी आले. तुला आधी मला चालवता येत नव्हते. तुझ्या बाबांनीच तुला शिकवलं मला चालवायला. कधी तू पडलास, तर कधी रडलास. पण तरीही तू मला चालवायला शिकलंच.
आधी तू माझी खूप काळजी घ्यायचास. मला दर दोन दिवसाला अंघोळ घालायचास. किती छान वाटत होतं मला! पण, आता मात्र तू खूप बदलला आहेस. मी आता तुझ्या कामाची राहिली नाही, म्हणून तू तर आता माझ्याकडे बघत सुद्धा नाहीस.
माझी ही अवस्थाही तूच केली आहेस. जर तू मला त्या काटेरी वाटेतून नेलं नसतेस, तर मी आज पंक्चर नसते झाले. मीच केव्हापासून तुला बोलतेय. तू तर काहीच बोलत नाहीयेस. मला वाटलं होतं की, तू माझी माफी मागशील. कदाचित, मला आयुष्यभर असंच पडून रहावं लागेल. मला नीट कर लवकर, म्हणजे पुन्हा मी तुला या जगाची सैर करून आणायला सज्ज होईल! नमस्कार! पुन्हा भेटू जर तू मला नीट केलेस तर!