पुल की मोरया
पर्यावरणाचा म्हास -- झाडेलावा, झाडे जगवा - झाडाचे उपयोग
उपाययोजना
वृक्षतोड-दुष्परिणाम
Answers
पृथ्वीची अवस्था प्रदूषणामुळे दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे. पृथ्वीवरील वातावरणाचा तोल ढळत आहे. 'पृथ्वीला वाचवा, आपल्या पृथ्वीची काळजी वाहा' हा 'वसुंधरा दिना' चा संदेश आहे. केवळ जंगलतोडीमुळेच पर्यावरणाचा तोल ढळतो असे नाही; महानगरे आणि कारखानेही या दुरवस्थेला हातभार लावत असतात.
गावोगावच्या नद्यांमध्ये कचरा व सांडपाणी सोडले जात आहे. उसाच्या मळीमुळे शेते निकामी होत आहेत. पावसाअभावी वाळवंटे वाढू लागली आहेत. अशी अनेक संकटे आपल्यापुढे उभी आहेत.पर्यावरणाचा ढासळणारा तोल सावरण्याचा एक महत्त्वाचा उपाय म्हणजे वृक्षारोपण
अलीकडे वृक्षारोपणाचे कार्यक्रम होतात. 'सामाजिक वनीकरणा'ची कल्पना आता रूढ होत आहे. झाडे लावणे जितके आवश्यक आहे, त्याहूनही ती वाढवणे व त्यांचे जतन करणे महत्त्वाचे आहे. यासाठी प्रत्येकाने एकतरी झाड दत्तक घेतले पाहिजे. झाडे लावली आणि त्यांची काळजी घेतली नाही तर काय उपयोग?
निष्काळजीपणामुळे अनेक झाडे मरतात. कधी त्यांना पाणी मिळत नाही. कधी भुकेलेली जनावरे लावलेली रोपटी खाऊन टाकतात. त्यामुळे लावलेल्या झाडांतील फारच थोडी झाडे जगतात; मोठी होतात.यासाठी आता मोहीम सुरू केली पाहिजे 'एकतरी झाड जगवा.' लग्न, मुंजी, वाढदिवस अशा निमित्ताने आपण भेटीदाखल पुष्पगुच्छ देतो, त्याऐवजी एक-एक रोप भेट दयावे.
please mark mi brainlist