प्लास्टिक पिशव्यांचा वापर बंद केल्याने कोणते फायदे होतील
Answers
Answer:
प्लास्टिकच्या वाढत्या वापरामुळे पर्यावरणाचे गंभीर प्रश्न निर्माण झाले अहेत. ५० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या पिशव्यांवर बंदी घालूनही त्यांचा सर्रास वापर सुरू आहे. या पिशव्यांना अटकाव करण्यासाठी यंत्रणा प्रभावी काम करताना दिसत नाही. आता प्लास्टिकच्या विविध उत्पादनांवर बंदी घालण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा प्लास्टिक बंदीचा मुद्दा चर्चेत आला आहे. त्यानिमित्ताने प्लास्टिक उत्पादक व पर्यावरणवादी यांना काय वाटते, याविषयीची त्यांची मते.
चुकीचा निर्णय
प्लास्टिकच्या उत्पादनांवर बंदी घालण्याचा राज्य सरकारचा निर्णय चुकीचा आहे. या निर्णयामुळे मूळ समस्या सुटणार नसून उलट अनेक प्रश्न निर्माण होणार आहेत. या निर्णयामुळे प्लास्टिक उत्पादन व्यवसायावर संकट येईल, हजारो लोकांचा रोजगार जाईल यात शंकाच नाही. यासंदर्भातील मूळ समस्या मात्र सोडवता आलेली नाही, याची खंत वाटते. विशिष्ट जाडीच्या प्लास्टिकच्या पिशव्यांच्या वापरावर यापूर्वीच बंदी घालण्यात आली आहे. तरीही या पिशव्यांचा सर्रास वापर सुरू आहे. विशिष्ट मायक्रॉन पेक्षा कमी जाडीच्या पिशव्यांचा पुन्हा करता येत नाही. या पिशव्या वापरून झाल्यावर लोक त्या कुठेही टाकून देतात. परिणामी त्या ड्रेनेज लाइनमध्ये अडकून पाणी तुंबण्यासारखी समस्या निर्माण होते. त्यामुळे या पिशव्यांवरील बंदीच्या अंमलबजवणीचे काय झाले, याचे उत्तर आधी सरकारने दिले पाहिजे. प्लास्टिक बंदीबाबत सरसकट निर्णय घेणे संयुक्तिक नाही. प्लास्टिकच्या ९० टक्के बाटल्या या रिसायकल होतात. ६० टक्के प्लास्टिक डम्पिंग ग्राउंडवर जाते, त्याचेही रिसाकलिंग होते. उद्योगातील १०० टक्के टाकावू प्लास्टिकचेही रिसायकलिंग होते. या वस्तुस्थितीकडे का डोळेझाक केली जाते? उद्या सरसकट बंदी आली, तर रोगापेक्षा उपाय भयंकर अशीच स्थिती होणार आहे. आजच्या घडीला लाखो लोक कार्यालयात जाताना पिण्याच्या पाण्यासाठी प्लाटिकच्या बाटल्यांचा वापर करतात. या बाटल्यांच्या जागी तुम्ही त्यांना काचेच्या बाटल्या वापरण्यास सांगणार का? तसे करणे सोयीचे होइल का? काचेच्या बाटल्यांचा वापर मोठ्या प्रमाणावर झाल तर या बाटल्यांची निर्मिती मोठ्या प्रमाणावर होईल. या बाटल्या तयार करताना मोठ्या प्रमाणावर कार्बनचे उत्सर्जन होते. कार्बनच्या वाढत्या उत्सर्जनाला आळा घालण्यासाठी जगभरात प्रयत्न होत आहेत. असे असताना आपल्या इथे मात्र उत्सर्जनाचे प्रमाण वाढेल. त्यामुळे पर्यावरणाच आणखी हानी होईल, या बाबीकडे कुणाचे लक्ष नाही. काचेच्या बाटल्या धुण्यासाठी मोठ्या प्रमाणावर पाणी लागते. त्यामुळे पाण्याचा वापर वाढेल. एखाद वर्ष कमी पाऊस झाला की, आपल्या इथे पाणी टंचाई नर्मिाण होते. त्यामुळे अशा प्रकारे पाण्याची नासाडी परवडणार आहे का? आजच्या घडीला सबंध भारतात प्लास्टिक उद्योगाचे ५५ हजार युनिट आहेत. त्यात ५.५ बिलियन टन प्लास्टिक तयार होते. लाखो लोक या युनिटमध्ये काम करतात. या व्यतिरिक्त प्लास्टिक प्रोसेसिंग उद्योगात पाच मिलियन कामगार आहेत. या सगळ्यांच्या रोजगारावर गदा येणार आहे. त्यामुळे अशा प्रकारे सरसकट बंदी घालणे घातक ठरणार असून आम्ही लवकरच यासंदर्भात सरकारशी बोलणी करणार आहोत.
Answer
Plastic paper uses is in the corographic papéaractic in one to the gmail
Explanation_ what her your question?
Perals name you ro kame