Art, asked by sweetypawara309, 3 months ago

पानी जपून वापरा मराठी पत्र लेखन​

Answers

Answered by pinky365
0

Answer:

पाणी दुर्मिळ वस्तू बनत चालली आहे याची आता आपल्या सर्वांना जाणीव व्हायला लागली आहे. जितके काटकसरीने आपण ते वापरू तितके ते जास्त दिवस पुरणार आहे. पाणी ही एक जीवनावश्यक बाब आहे. त्यामुळे ते वापरावे लागणारच आहे पण ते वापरत असतांना जरा थोडे जपून अथवा काटकसरीने वापरले तर त्यात निव्वळ आपलेच नव्हे तर समाजाचेही भले आहे. मग चला तर आपण शोधू या पाण्याच्या बचतीचे मार्ग :

1. नळ सुरू ठेवून तोंड धुतले तर 20 लिटर पाणी आपण वाया घालतो. मग मध्ये पाणी घेवून तोंड धुतले तर फक्त 5 लिटर पाणी लागते.

2. बेसीन मधला नळ चालू ठेवून दाढी केली तर 25 लिटर पाणी लागते पण मग मध्ये पाणी घेवून दाढी केली तर दाढी 5 लिटरमध्येच आटोपते.

3. बादली मध्ये पाणी घेऊन आंघोळ केला तर फक्त 20 लिटर पाणी लागते पण शॉवर खाली उभे राहून आंघोळ केली तर 250 लिटर पाणी आपण वापरतो.

4. टबमध्ये बसून आंघोळ करणे हा पाण्याच्या अतिरेकी वापर ठरतो. यासाठी 600 लिटर पाणी लागते.

5. बादली मध्ये पाणी घेवून भांडी घासली तर 40 लिटर पाणी लागते पण तीच भांडी वाहत्या नळाखाली धुतली तर 200 लिटर पाणी लागेल.

6. बादलीमध्ये पाणी घेऊन कपडे धुतले तर 40 लिटरमध्ये काम भागते पण वॉशिंग मशीनमध्ये कपडे धुतले तर एका वापरात 200 लिटर पाणी लागते

Similar questions