पानातील शिवाजी मागणी कशी आहे?
Answers
: विशिष्ट काळात, विशिष्ट किंमतीला वस्तूचे विशिष्ट परिमाण मागितले जाणे. उपभोक्त्याला आपल्या अनेकविध गरजा भागविण्यासाठी उपभोग्य वस्तूंची आवश्यकता भासते. म्हणूनच उपभोक्ता किंवा ग्राहक आपल्याजवळ असलेल्या क्रयशक्तीचा उपयोग करून उपभोग्य वस्तू खरेदी करतो; म्हणजे उपभोक्ता त्या त्या वस्तूंची मागणी करतो. म्हणूनच एखादा ग्राहक दुधाची मागणी करतो, म्हणजे दर लिटरला विशिष्ट भावाने ग्राहक विशिष्ट परिमाण दूध खरेदी करण्यास तयार आहे, असा अर्थ अभिप्रेत होतो. अशा रीतीने ‘मागणी’ या शब्दात वस्तूचे परिमाण आणि ते विकत घेण्यासाठी किंमत देण्याची तयारी म्हणजेच क्रयशक्तीचे अस्तित्व, या दोहोंचाही अंतर्भाव होतो.
अत्यल्प काळात किंवा एखाद्या क्षणी उपभोक्ता एखादी वस्तू निरनिराळ्या किंमतींना निरनिराळ्या परिमाणांत खरेदी करण्याची तयारी दर्शवील. उपभोक्त्याने किंवा ग्राहकाने निरनिराळ्या किंमतींस मागणी केलेल्या एखाद्या वस्तूच्या परिमाणांच्या कोष्टकाला व्यक्तीचे ‘मागणी कोष्टक ’ असे म्हणतात. या कोष्टकात एका बाजूला वस्तूची प्रत्येक नगास किंमत व दुसऱ्या बाजूस वस्तूचे मागणी-परिमाण ही दिलेली असतात. व्यक्तीचे मागणी-कोष्टक खाली दिल्याप्रमाणे असते :