पाणी आडवा पाणी जिरवा निबंध लेखन मराठी खलील मुद्दे येणे आवश्यक (1) वृक्षलागवड आणि भूजळ पातळी वाढवणे (2) पावसाच्या पाण्याचे व्यवस्थापन(3) पाणीटंचाई ही समस्या (3) शेतीच्या उत्पादनावर परिणाम.
answer Plz plz plz plz
Answers
Answer:
हवा, पाणी निसर्गाने मानवाला दिलेली मुक्त देणगी आहे. पाणी जीवनावश्यक असल्यामुळे पाण्याच्या टंचाईची समस्या सोडवण्याचा अग्रक्रम द्यावा लागतो. खेड्या पाडावी समस्या फारच बिकट आहे. शहरात ठराविक वेळी पाणी येत असेल, तर सर्व व्यवहार झटपट उरकून पाणी भरून ठेवता येते. पण खेड्यापाड्यातील लोकांना घडाभर पाण्यासाठी मैलोनमैल चालत जावे लागते. किंवा गावात येणाऱ्या टँकरमधून, कष्टपूर्वक पाणी मिळवावे लागते. अर्थातच मिळालेल्या पाण्याचा उपयोग प्रथम पिण्यासाठी व अन्न शिजवण्यासाठी करणे भाग पडते. स्वच्छतेसाठी पाणीच नसल्यामुळे स्वच्छतेतून रोगराईचा प्रादुर्भाव झाल्यास नवल काय ? माणसाच्या दैनंदिन व्यवहारासाठी पाण्याची एवढी चणचण भासते, तर शेतीला आणि वनस्पतींच्या वाढीला पाण्याची गरज किती पराकोटीची असेल, याची कल्पना केलेलीच बरी .
जमिनीवर पडणाऱ्या पावसाच्या पाण्याचे योग्य नियोजन नसल्यामुळे बरेच पाणी वाहून वाया जाते. कमी पाऊस पडणाऱ्या प्रदेशात तर पाण्याचा हा अपव्यय होय. महाराष्ट्रात पडणाऱ्या पावसाचा विचार करता आपल्याकडे पाणी जिरवणे व ‘पाणी साठवणे’ या दोन तंत्राची खूप जरुरी आहे. पाणी साठवण्यापेक्षा जमिनीत जिरविलेल्या पाण्याचा फायदा असा की, भूगर्भातील पाण्याचे बाष्पीभवन होत नाही व त्यामुळे त्यात घट होत नाही.जल व्यवस्थापन म्हणजे केवळ धरणे बांधून पाइपलाइन्स शहरांपर्यंत नेणे व पाण्याचा फ्लश सोडून घरातील घाण बाहेर घालवणे एवढा मर्यादित अर्थ नाही. जलव्यवस्थापन याचा अर्थ समाज व पाणी यांच्यातील संबंध प्रस्थापित करून पाण्याच्या प्रत्येक थेंबाची किंमत पटवून देणे होय, त्यासाठी पाण्याचा वापर अधिक काळजीपूर्वक करण्याचा शहाणपणा आपल्या अंगी आला पाहिजे. अन्यथा सर्वाना पुरवता येईल एवढे पाणीच राहणार नाही.भारताच्या उष्ण वाळवंटात, कुंडी हे अतिशय साधे साठवण-तंत्रज्ञान वापरून जलव्यवस्थापनाचा मोठा परिणाम साधला आहे. कृत्रिमरीत्या तयार करण्यात आलेल्या जमिनीच्या तुकडय़ावर तेथे पावसाच्या पाण्याचे संधारण करण्यात आले आहे. हे पाणी मग उतारावरून विहिरीत जाऊन साठेल अशी व्यवस्था केली आहे. जर पाऊस एकंदर १०० मि.मी पडला आणि ते सर्व पाणी साठवले तर एक हेक्टर जमिनीवर १० लाख लिटर पाणी साठवता येते. देशात काही ठिकाणी पुराच्या पाण्याचे संधारण करण्यात आले आहे