पाणी अडवा आणि पाणी जिरवा या विषयावर निबंध लिहा
Answers
पाणी हे निसर्गाने दिलेले अमूल्य असे स्तोत्र आहे , पाणीच जर नसेल तर.... हि कल्पना सुद्धा अंगावर शहारे आणून सोडते . सकाळपासून तर रात्रीपर्यंत पाण्याचा प्रत्येक कार्यात उपयोग होतो. विशेषतः पाणी पिण्यासाठी वापरले जाते. पृथ्वीचा ७०% भाग पाण्याने व्यापला आहे . परंतु तरीही आज पाण्याची टंचाई सर्वदूर जाणवत आहे. मोठ्या प्रमाणात होणारे व्यापारीकरण , शहरीकरण यामुळे पाण्याच्या साठवणुकीला तडा जात आहे. रस्ते बांधकामासाठी नदी नाल्यांची दिशा बद्दलि जात आहे. त्यामुळे सर्वदूर पाण्यासाठी वणवण होत आहे, म्हणूनच सर्व नागरिकांनी आपल्या दैनंदिन जिवनात पाण्याचा वापर सांभाळून करावा . घरातील सांडपाणी शेतात सोडावे, वॉटर हार्वेस्टिंग ची सुविधा करावी, जास्तीत जास्त पाणी जमिनीत कसे मुरवता येईल याचा अभ्यास करावा. लोकसहभागातून शेतात बंधारे तयार करावेत , कारण "जल है तो कल है!" म्हणूनच "पाणी आडवा ,पाणी जिरवा. "
Answer:
हवा, पाणी ही निसर्गाने मानवाला दिलेली मुक्त देणगी आहे. पाणी हे जीवनावश्यक असल्यामुळे पाण्याच्या टंचाईची समस्या सोडवण्याला अग्रदयावालागतो लागतो.
खेड्यापाड्यांतून ही समस्या फारच बिकट आहे. शहरात ठरावीक वेळी पाणी येत असेल, तर सर्व व्यवहार झटपट उरकून पाणी भरून ठेवता येते. पण खेड्यापाड्यांतील लोकांना घडाभर पाण्यासाठी मैलोन्मैल चालत जावे लागते किंवा गावात येणाऱ्या टँकरमधून, कष्टपूर्वक पाणी मिळवावे लागते. अर्थातच मिळालेल्या पाण्याचा उपयोग प्रथम पिण्यासाठी व अन्न शिजवण्यासाठी करणे भाग पडते. स्वच्छतेसाठी पाणीच उपलब्ध नसल्यामुळे अस्वच्छतेतून रोगराईचा प्रादुर्भाव झाल्यास नवल काय? माणसाच्या दैनंदिन व्यवहारासाठी पाण्याची एवढी चणचण भासते, तर शेतीला आणि वनस्पतींच्या वाढीला पाण्याची गरज किती पराकोटीची असेल, याची कल्पना केलेलीच बरी !
वास्तविक, भारत हा नदयांचा देश आहे. भारताच्या काही भागांत पावसाचे पाणीही भरपूर मिळते. कोकणात व इतर अनेक ठिकाणी प्रचंड पाऊस पडतो. पावसाळ्यात भारतातील काही नदयांना पूर येतात. ब्रह्मपुत्रा, गंगा, यमुना, गोदावरी इत्यादी नदयांना येणाऱ्या पुरांमुळे आजूबाजूच्या प्रदेशाची वाताहत झाल्याच्या बातम्या वर्तमानपत्रांत वारंवार येतात. याचा अर्थ असा की, उपलब्ध होणाऱ्या पाण्यापैकी ८० टक्के पाणी वाहून जाते, हे भारताचे दुर्दैव आहे.
धरण बांधून पाणी अडवणे हा त्यावरचा एक उपाय आहे. तसेच, देशभरच्या नदया एकमेकांना जोडून नदयांचे जाळेच निर्माण करण्याची एक योजना सध्या सरकारच्या विचाराधीन आहे. हा फारच मोठा फायदा देणारा उपाय आहे. पण ही योजना अत्यंत खर्चिक आणि खूप वर्षे लावणारी आहे. काही धरणांमुळे काही लोकांची सोय झाली असली तरी अजून असे कितीतरी जिल्हे आहेत की, जिथे उन्हाळ्यात लोकांना थेंबभर पाणी मिळणे मुश्कील होते.
भाक्रा-नानगल, दामोदर व्हॅली, कोयना, नाथसागर, नागार्जुनसागर अशी धरणे भारतात ठिकठिकाणी बांधली गेली, ही गोष्ट चांगली आहे. पण धरणांमुळे इतरही काही समस्या निर्माण झाल्या. धरणांमुळे खेड्यापाड्यांत वीज पोहोचली हे चांगले झाले; पण त्यामुळे विजेवर चालणारे पाण्याचे पंप वापरले जाऊ लागल्यामुळे पाण्याचा मोठ्या प्रमाणात उपसा होऊन विहिरी कोरड्या पडल्या. नदयांचे पाणी धरणांकडे खेचले गेल्यामुळे नदया कोरड्या पडल्या. विजेमुळे कारखाने सुरू झाले ही गोष्ट चांगली घडली; पण कारखान्यातील दूषित पाणी नदीत सोडले गेल्यामुळे जलप्रदूषण होऊ लागले. गंगा-यमुनेसारख्या मोठ्या नदया इतक्या प्रदूषित झाल्या आहेत की, त्या शुद्ध करण्यासाठी कित्येक हजार कोटी रुपयांच्या योजना आखण्याची गरज निर्माण झाली आहे.
पिण्याच्या पाण्याप्रमाणेच शेतीसाठीही आपल्याला पाण्याची गरज आहे. पाण्यासाठी आपण कितीही विहिरी खोदल्या वा कितीही पाण्याचे पंप बसवले, तरी ते सर्व निरुपयोगी ठरणार आहे. कारण जमिनीखालील पाण्याची पातळीच खाली खाली जात आहे. ही पातळी कशी वाढेल हे प्रथम पाहिले पाहिजे. यासाठी दोन योजना तातडीने हाती घेतल्या पाहिजेत. एक म्हणजे मोठ्या प्रमाणावर झाडांची लागवड करणे. झाडे आपल्या मुळांद्वारे जमिनीखालील पाण्याचे झरे धरून ठेवतात. झाडांची संख्या वाढली तर जमिनीखालील पाण्याची पातळी वाढण्यास मदत होईल. सध्या बेसुमार वृक्षतोडीमुळे झाडांची संख्या झपाट्याने कमी होत आहे. म्हणून मोठ्या प्रमाणावर झाडे लावली पाहिजेत. तसेच, 'पाणी अडवा, पाणी जिरवा' ही दुसरी योजनाही युद्ध पातळीवर राबवायला हवी. यामुळेही जमिनीखालील पाण्याची पातळी वाढेल. मग झरे, विहिरी, नदया यांचे पाणी आटणार नाही. पाणी मोठ्या प्रमाणावर उपलब्ध होईल आणि आपले जीवन खऱ्या अर्थाने बहरू लागेल.