Biology, asked by Rhutika, 1 year ago

पाणी हेच जीवन निबंध मराठी

Answers

Answered by harshu006
823

पाण्याचे महत्व

पाणी म्हणजे जल, आणि जल हे

जीवन आहे या वाक्यावरण पाण्याचं या सृष्टीवर काय महत्व आहे ते जाणवते. कारण पृथ्वी

वरील सर्व सजीवांचे जीवन पाण्यावरच अवलंबून आहे.

पृथ्वी वरील सर्व जीवांना जिवंत राहण्यासाठी

शरीरातील पाण्याचे प्रमाण सदासर्वकाळ योग्य व पुरसे ठेवावे लागते. शरीरातील

पाण्याच प्रमाण १० टक्कयाहून कमी झाले तर कोणताच सजीव जिवंत राहू

शकत नाही. मानवी शरीर अन्नाशिवाय काही आठवडे जीवंत राहू

शकतो पण पाण्याशिवाय सात दिवसापेक्षा जास्त दिवस तो जगूच शकत नाही.

मनुष्याला

फक्त पिण्यासाठी नाही तर आंघोळीसाठी, कपडे

धुण्यासाठी, भांडी धुण्यासाठी म्हणजेच अनेक नित्योपयोगी गोष्टींसाठी पाणी आवश्यक आहे. औद्योगिक क्षेत्रात पाण्याची

आवश्यकता असते. ऊर्जानिर्मितीसाठी पाणी

हेच माध्यम आहे. शेती करण्याकरता तर पाण्याची गरज सर्वात

मोठी आहे..

दिवसें न दिवस

वाढती लोकसंख्या,  मोठ्या

प्रमाणात औद्योगीकरण, जंगल

तोड, जल प्रदूषण, कमी पाऊस, आटते जलस्त्रोत, उपलब्ध जलसाठ्यांचा गैरवापर

यांच्यामुळे पाणी ची टंचाई जाणवत आहे. व हा एक

गंभीर मुद्दा बनला आहे. आणि पाणी टंचाई चा प्रश्न मनुष्यच सोडवू शकतो. जर

प्रत्येक व्यक्ती पाण्याचे महत्व समजून त्याचा सांभाळून उपयोग करेल तर मग कधीही

पाण्याची कमतरता भासणार नाही. म्हणतात न थेंबे थेंबे तळे साचे.

plz mark it as brainlist

Answered by uttambhoye291
323

Answer:

पाणी आपले जीवन. पाण्याशिवाय जीवन नाही. हे खरे आहे पण आपण ह्या जीवनाचा आदर राखतो का ? देशातील जे पाण्याचे स्तोत्र आहेत ते दुषित होत चालले आहेत. आपण आपल्या हाताने पाण्याचे हे स्तोत्र नष्ट करत आहोत का ? पुढील पिढ्यांसाठी आपण ह्या प्रदूषित नद्या, दुषित पाण्यामुळे होणारे रोग हा वारसा ठेवून जाणार आहोत का याचा प्रत्येक सुज्ञ माणसाने विचार करायला हवा.

अनिर्बंध वाळू उपसा, नद्यांच्या पात्रात अडथळा करणे ह्याने आपण आपल्या निसर्गाची अवहेलनाच करत आहोत. देशातील जवळ जवळ दोन तृतीयांश नद्या ह्या कोरड्या पडल्या आहेत तर बाकीच्या प्रदूषित झाल्या आहेत . शेती साठी लागणारी जमीन आहे पण प्रदूषित पाण्यामुळे पीकही घेवू शकत नाही अशी आपल्या इथल्या शेतकर्याची अवस्था आहे. पाण्याचे नीट नियोजन न केल्याने दुष्काळ हा देशाच्या पाचवीला पुजलेलाच आहे.

आणि जो पाणीसाठा शिल्लक आहे त्यात कारखान्यांमधून होणारे प्रदूषण, नदीकिनारी केली जाणारी धार्मिक कृत्ये, नदीत मोठ्या प्रमाणावर टाकला जाणारा कचरा ,वसाहतीतून सोडण्यात येणारे सांडपाणी, गंगेत काही ठिकाणी प्रेत सुद्धा सोडले जाते. हे करून आपण निसर्गाला नष्ट करण्यात हातभारच लावत आहोत जलचरांच्या दुर्मिळ जाती नष्ट करत आहोत नि निसर्गाचा विध्वंस करत आहोत. नद्यांना वाहते ठेवल्यास देशात आपण हरित क्रांती घडवू शकतो. नद्यांचे मोठ्याप्रमाणात होणारे प्रदूषण रोखून आपण निसर्ग वाचवण्यात आपला खारीचा वाट उचलू शकतो.

महाराष्ट्रात नाशिकला कुंभमेळा भरतो करोडो लोक तेथे स्नान करून पावन होतात. परंतु गोदावरी नदी हि अत्यंत प्रदूषित झालेली आहे. मेगासेसे पुरस्कार विजेते जलतज्ञ राजेंद्र सिंह ह्यांनी ‘कुंभ मेळ्यात मुख्यमंत्र्यांनीच आधी स्नान करून आचमन करून दाखवावे असा उपरोधिक टोला लावला आहे.’ ह्या वरून बोध घेवून सरकारने नद्या प्रदूषित होवू नये म्हणून पावले उचलणे गरजेचे वाटते.

Similar questions