पाणी टंचाई एक ज्वलंत समस्या Marathi essay
Answers
Answer:
water shortage
Explanation:
नेमेचि येतो पावसाळा’ असे म्हणण्यापेक्षा ‘नेमेचि येतो दुष्काळ’ असं म्हणण्यासारखी परिस्थिती गेल्या काही वर्षांत निर्माण झाली आहे. उन्हाळ्यात निर्माण होणारी भीषण पाणीटंचाई, पिण्याच्या पाण्यासाठी मागवावे लागणारे टँकर्स, पाण्याअभावी करपलेली शेती यांची दाहकता शब्दांपलीकडली आहे. हा जीवन जाळणारा वणवा बघून कळतं की, पाण्याला ‘जीवन’ असं का म्हणतात. हे सगळं जरी कितीही खरं असलं तरी २०१२ च्या दुष्काळानंतर पेव फुटलेल्या अनेक उपाययोजना जसं की, नाला खोलीकरण आणि रुंदीकरण, मागेल त्याला विहीर-शेततळी, जलयुक्त शिवार या सगळ्या बातम्यांनी वृत्तपत्रं आणि प्रसारमाध्यमे नटलेली आपल्याला दिसतात. पाणी या विषयावरची अजून एक लेखमाला यामध्ये आम्ही नेमकं काय नवीन मांडायचा प्रयत्न करतोय?
‘पाणी’ हा विषय जरी कितीही चावून चोथा झालेला असला तरी याबद्दल बऱ्याच गैरसमजुती किंवा अज्ञान दिसून येतं. जसं की, आपण जितकं जास्त पाणी अडवायचा प्रयत्न करू तितकंच ते जमिनीत मुरेल म्हणून नदी-नाला यांची खोली जितकी जास्त तितकं उत्तम. पाझर तलाव किंवा पाणी साठवण्याचा तलाव यांची जागा शिवारात कुठेही असू शकते. एका शेतात खोदलेल्या विहिरीला खूप पाणी लागलं तर शेजारच्या शेतातील विहिरीलापण तितकंच पाणी लागेल, वगैरे.. पण आडात नाही तर पोहऱ्यात कुठून येणार, हे लक्षात न घेता पाणलोट क्षेत्रात करण्यात येणारी निरनिराळी कामं अनावश्यक खर्च आणि नवीन समस्या समोर घेऊन येतात. नळाला पाणी नाही आलं तर काय, आम्ही पैसे देऊन टँकर मागवू शकतो, अशी मुजोर मानसिकता सर्वत्र आढळून येते. त्यामुळे विहिरी, बोअरवेल्सच्या माध्यमातून दिसणारं जमिनीच्या खाली दडलेलं भूजल, हा मात्र सगळ्यात दुर्लक्षित विषय आहे.
.
Answer:
please mark as brainliest