पाणी टंचाई एक ज्वलन समस्या निबंध
Answers
Answer:
पाणी म्हणजे जीवन अन् जीवन म्हणजे पाणी या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. काही दिवसांपूर्वीच आपण जागतिक जलदिन साजरा केला खरा; पण त्यातून काय बोध घेतला का हो? कडक उन्हाळ्यात कदाचित तो जागतिक जलदिन म्हणून महत्त्वाचा ठरलाही असेल, पण वर्षातील 8 महिने पाण्याची काळजी कोणाला नसते. किंबहुना पाणी बचत, पाणी टंचाई या विषयावर बोलायलासुद्धा वेळ नसतो.
उन्हाळ्याच्या झळा लागल्या की सर्वजण खडबडून जागे होतात. तहान लागली की विहीर खोदतात. दिवसेंदिवस कमी होणारे पर्जन्यमान, पाण्याचा तुटवडा, ग्लोबल वार्मिंग, पर्यावरणातील बदल, वाढती लोकसंख्या, कमी पडणारा पाणीसाठा, पाण्याचा अपव्यय अशा बर्याच गोष्टींमुळे पाणी टंचाई व दुष्काळाला सामोरे जावे लागत आहे.
पाणी अडवा, पाणी जिरवा, शेततळी बंधारे व शेतात ठिबक सिंचन योजना या गोष्टींकडे जर माणूस वळला तर पाण्याचे योग्य नियोजन होऊ शकते. त्यासाठी फक्त एकजूट, कष्टाची तयारी हवी. तरच या दुष्काळ नावाच्या शापातून कायमची मुक्ती मिळू शकते.
Explanation: