Environmental Sciences, asked by parkashphulkan7876, 10 months ago

पाणि वाचवा
उपाययोजना

Answers

Answered by vc6070180
1

Answer:

पाणी बचतीचे उपाय

* घरातील नळांची गळती अजिबात होऊ देऊ नये. थेंब थेंब गळणाऱ्या नळातून दिवसाला ३० ते ४० लिटर पाणी वाया जाते याचे भान राखणे महत्त्वाचे आहे. त्वरित उपाययोजना करून ही गळती थांबवावी.

* शॉवरमुळे पाण्याची बचत होते, पण त्याखाली तासन्तास उभे राहू नका व पाण्याचा अपव्यय टाळा. पाण्याच्या मीटरवर नीट लक्ष ठेवून आपले पाणी वाया जात नाही ना, याची दक्षता घ्या. आपले वाहन धुण्यासाठी पिण्याच्या पाण्याचा मुक्तहस्ताने वापर करू नका. पावसाचे पाणी जेव्हा शक्य असेल तेव्हा त्यासाठी जरूर वापरा.

* इमारतींच्या गच्चीवर पावसाचे पाणी पडते त्याला वाट करून देऊन ते जमिनीत मुरविले तर पुढचे ६-७ महिने तेच पाणी नलिकाकूप विहिरीतून वापरता येईल. इमारतीची गच्ची ४० मी. ४० मी. असेल तर मुंबईच्या पावसात चार महिन्यांत ३२ लाख लिटर पाणी जमिनीत मुरवता येईल!

* दात घासताना किंवा दाढी करताना नळ चालू ठेवू नका. भाज्या किंवा फळे धुताना नळाखाली न धुता जर त्यासाठी परात किंवा भांडय़ाचा वापर केला तर ते पाणी फेकून न देता झाडांसाठी वापरता येईल. इमारतीच्या आवारातील झाडे तेथे वास्तव्य करणाऱ्या सदस्यांनी दत्तक घ्यावीत व त्यासाठी पाण्याचा असा उपयोग करावा. कुकरमधील पाण्याचा वापरदेखील असाच करता येईल. तांदूळ धुतल्यानंतरचे पाणी वनस्पतींना पोषक असते म्हणून ते त्यासाठीच वापरा.

Similar questions