India Languages, asked by Kshitu73, 6 months ago

पाणी वाचवणे काळाची गरज' याविषयी तुमचे मत लिहा.

Answers

Answered by sachintsrivastava
7

Explanation:

वैदिक संस्कृतीमध्ये आर्यांनी पंचमहाभूतांना देव मानले. पृथ्वी, पाणी, तेज, वायू, आकाश ही पंचमहाभूते. त्यांचे आपल्या जीवनावर असलेले उपकार आणि त्यांचे महत्त्व ओळखून त्यांनी आपल्यावर संतुष्ट राहावे व त्यांच्याविषयी कृतज्ञता बाळगावी या हेतूने पंचमहाभूतांची पूजा सुरू झाली. पाणी हे त्यातील एक. अन्न, वस्त्र, निवारा या मूलभूत गरजांमध्ये पाणी आहेच. पाण्यावरच सजीवांचे जीवन अवलंबून आहे. अन्नाशिवाय माणूस एकदोन दिवस राहू शकेल मात्र, पाण्याशिवाय एक क्षणही राहू शकणार नाही. सृष्टीतील सर्व सजीव पाण्यावरच जगतात. घर बांधण्यासाठीही पाण्याची आवश्यकता असते. उन्हाळ्यात पाण्याचे महत्त्व कळते. उन्हात तापून सगळी सृष्टी भाजून निघते. मात्र, पावसाने सारी सृष्टी पुन्हा जिवंत होते. तिला पुन्हा नवे जीवन मिळते म्हणूनच पाऊस पडायला लागला की, ‘आता जीवनमय संसार’ असे म्हणतात. पाण्याचे हे महत्त्व ओळखून आपण पाण्याची पूजा करतो. आजही नदी दिसली की, लोक तिला नमस्कार करतात, समुद्राला नारळ देतात, तसेच घरामध्येही ‘उदकशांत’ हा विधी करतात. निसर्गामध्ये पाणी जास्त आहे कारण पाणी हा निसर्गाचाच एक घटक आहे. खेड्या-पाड्यात, डोंगर-दर्‍यांत, सृष्टीसौंदर्य दृष्टीत पडते, कारण तेथे पाण्याचे जिवंत स्त्रोत असतात.

Answered by Anonymous
13

Answer:

पाणी बचत हा कळीचा मुद्दा बनलाय.सर्वत्र पाण्याचा प्रश्न भेडसावत आहे हंडाभर पाण्यासाठी पायपीट करावी लागत आहे खेड्यातील असो वा शहरातील प्रत्येक बायकांना या समस्येला सामोरे जाव लागत आहे.तास् न तास् टँकरची वाट पाहत लांबलचक रांगेत तीव्र उन्हात उभ टाकाव लागत आहे.या सर्व परीस्थीतीने सामान्य माणुस हातबल झालाय.त्या मुळे या परीस्थीतिशी सामना करण्यासाठी पाण्याचे कटाक्षाने नियोजन करणे अत्यंत गरजेते आहे.''पाण्याची बचत करा''.हे एेकुन किंवा बोलुन चालत नाही तर ते प्रत्यक्षात आनाव लागेल.प्रत्येकाला पाणी बचत ही सवय बनवावी लागेल तरच हे शक्य आहेे. गावा गावात महिला पाण्यासाठी वणवण भटकतांना दिसून येत आहेत . एका Tanker चे पाणी घेण्यासाठी नागरिकांची झुंबड उडते आहे . शेतकरी उजाड झालेल्या शेताकडे पाहून खिन्न झाल्याचे चित्र दिसते . असंख्य पक्षी व प्राण्यांची पाण्यावाचून तडफड सुरु झाली आहे . अशा वातावरणात जेथे पाण्याची परिस्थिती बरी आहे , तेथील नागरिकांनी पाण्याची बचत करणे गरजेचे आहे . या परिस्थितीत धुलीवंदन आणि रंगपंचमीला लाखो लिटर पाणी वाया घालवू नये . रंग खेळणे आपली संस्कृती आहे . परंतु आजची परिस्थिती मात्र वेगळी आहे . पाण्याचा अपव्यय न करता यंदा धुलीवंदन , रंगपंचमीला फक्त रंगाचा टिळा लावून होळीचा आनंद घ्यावा . अपायकारक , रासायनिक रंगापासूनही कटाक्षाने दूर राहिले पाहिजे .

Similar questions