India Languages, asked by TransitionState, 10 months ago

पाण्याचे महत्व मराठी माहिती निबंध भाषण लेख Importance of Water...

Answers

Answered by StarCool
14

Answer:

पाणी हा मानवी जीवनाचा मूलभूत घटक आहे. पाणी नसेल तर संपूर्ण जीवसृष्टीचे अस्तित्वच धोक्यात येईल. आपल्या दैनंदिन जीवनात पाण्याचे अपार महत्व आहे.अन्नपदार्थ ग्रहण करणे आणि विष्ठेच्या रूपात बाहेर टाकणे यासाठी पाण्याचाच उपयोग होतो. शारीरिक तापमान समतोल राखण्यासाठी पाण्याचा उपयोग होतो. हे शरीरातील भागासाठी वंगणाचे काम करते. पाणी अन्नाच्या प्रत्येक उष्मांकाला आवश्यक असते. म्हणजे रोजच्या १५00 ते २000 आवश्यक कॅलरीजसाठी दररोज ६ ते ८ ग्लास पाणी (१.५ ते २ लिटर) पिणे प्रत्येक दिवसाला गरजेचे असते. आपल्याला येणारा घाम, मूत्र आणि विष्ठेतून पाणी शरीरातून बाहेर उत्सजिर्त केले जाते. या उत्सर्जनाच्या प्रमाणात आपला पाणी पिण्याचा रोजचा कोटा असावा. त्यामुळे उन्हाळ्यात जास्त पाणी प्यावे. आपण निरोगी राहण्यासाठी पाणी तर लागतेच; पण ते स्वच्छ, शुद्ध आणि रोगजंतूविरहित असावे लागते. पिण्याच्या पाण्यामधून अनेक प्रकाराचे विषाणू, जीवाणू, रोगजंतू, जंत आणि विषारी पदार्थ शरीरात जाऊन आपले आरोग्य बिघडवू शकतात. त्यामुळे पाणी शुद्ध करून पिणे जरुरी असते. plzzz give me the brainliest answer

Explanation:

Answered by Hansika4871
14

पाणी हे जीवन आहे. पृथ्वीवरील १/४ भाग गोड्या पाण्याचा आहे. बाकीचे पाणी समुद्राच्या रूपात आहे म्हाजेच खारट. बरेचसे पावसाचे पाणी वाया जाते, ते साठवण्यासाठी च्या योजना कमी पडतात.

एवढ्या मोठ्या लोकसंख्येला पाण्याची गरजही तेवढीच असते. पाण्याचा वापर वेगवेगळा होतो. पाणी नसेल तर जीवसृष्टी नष्ट होईल, पाण्यापायी लोकांचे प्राण जातील. पाणी आहे तर आपण आहोत म्हणून पाणी हे जपून वापराव त्याचं मोल सगळ्यांनी जाणाव.

Similar questions