पाण्याची उपलब्धता हा लोकवस्तीस चालना देणारा प्रमुख घटक आहे।
(भौगोलिक कारणे)
plzz give me an answer fast
Answers
पृथ्वीवर पाणी, वायू, अग्नी, धरती असे घटक सापडले जातात. पाणी म्हणजेच जल हे खूप महत्त्वाचे तत्त्व आहे. पाण्याशिवाय आपली रोजची कामे अपूर्ण राहतील. पिण्याच्या पाण्यापासून ते थेट आंघोळीच्या पाण्यापर्यंत रोजच्या जीवनात पाण्याला खूप महत्त्व आहे.
काही छोट्या गावांमध्ये अथवा काही समुदाय मध्ये लोकवस्ती ही विशिष्ट कायमस्वरूपी न राहता ती आपल्या गरजांनुसार स्तलांतर करत असतात, त्यात सर्वात महत्त्वाचे कारण पाणी होय. पाण्यामुळे शेती पिकते, जर पाणीच नसेल तर माणसं काय खातील हा मोठा प्रश्न पडतो.
अजुन काही करणे:
१) शेती साठी लागणारे पाणी
२) प्यायचे पाणी
३) आंघोळीचे पाणी
४) प्राण्यांना लागणारे पाणी
५) भांडी धुण्यासाठी लागणारे पाणी
६) त्या जागेचे पाण्याचे पात्र (किठी मोठे आहे ? अजुन किती दिवस पाणी पुरेल )
उत्तर :-
१) मानवास दैनंदिन जीवनात पिण्यासाठी व इतर अनेक कारणांसाठी पाण्याची नितांत आवश्यकता असते. शेती व इतर अनेक उद्योगांसाठी पाणी अत्यावश्यक असते.
२) पाण्याची उपलब्धता नसल्यास शेतीचा व परिणामी इतर व्यवसायांचा विकास होत नाही. अशा प्रदेशात मानवी वस्तीचा विकास होत नाही.
३) पाण्याच्या उपलब्धतेमुळे शेतीचा व परिणामी इतर व्यवसायांचा विकास होतो.
अशा प्रकारे, पाण्याची उपलब्धता हा लोकवस्तीस चालना देणारा प्रमुख घटक आहे.
तुला हे उत्तर मदत करेल अशी आशा करतो.