Art, asked by sangitabhujade023, 1 month ago

पाणयाच्या टंचाईवर मात करणयासाठी आपण कोणता उपाययोजना सुचवाल?

Answers

Answered by aayushav06
8

वॉशर खराब झाल्याने बऱ्याच घरी नळातून थेंब-थेंब पाणी गळत असतं. अशा नळांची त्वरीत दुरुस्ती करा. कारण या क्षुल्लक वाटणाऱ्या गळतीतून संपूर्ण दिवसभरात किती तरी लिटर्स पाणी वाया जात असतं.

आंघोळीसाठी शॉवर आणि बाथटबचा वापर टाळा किंवा कमी करा. कारण त्यात खूप पाणी अनावश्यक वाया जातं.

दाढी करताना आणि दात घासताना नळ सुरू ठेवणं टाळा.

धुणी, भांडी करणाऱ्यांना नळ सुरू ठेवून काम करण्यास मनाई करा.

आजकाल पाहुण्यांना पाणी देण्यासाठी तांब्या-भांडं दिलं जात नाही. थेट ग्लास भरून आणतात. पाहुणे आवश्यक तेवढं पाणी पितात आणि उरलेलं पाणी फेकून देतात. तांब्या-भाडं समोर ठेवल्यास पाहुणे त्यांना हवं तेवढंच पाणी घेतात आणि पाण्याचा अपव्यय टळतो.

झाडांना एकसारखं पाणी देऊ नका. पाण्यासाठी आणि झाडांसाठीही ते नुकसानकारक आहे.

Answered by franktheruler
6

पाणयाच्या टंचाईवर मात करणयासाठी आपण खाली उपाय योजना सुचवाल.

  • पाणीटंचाईवर मात करण्यासाठी सरकारने खाऱ्या पाण्याचे गोडय़ा पाण्यात रूपांतर करण्यासाठी नवीन आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा आधार घेण्याचा निश्चय केला आहे.
  • पाणी बचत, पुनर्वापर आणि नियोजन याबाबत शालेय अभ्यासक्रमात समावेश करण्यात यावा.
  • वाहने धुण्यासाठी पिण्याच्या पाण्याचा वापर न करणे आणि अंघोळीसाठी शॉवरचा वापर न करणे.
  • किमान सहा महिन्यांतून प्रत्येक सोसायटीने एकदा पाण्याचे ऑडिट करणे.
  • बांधकामात बोअरवेलचे पाणी वापरणे.
  • ज्या ठिकाणी पिण्याचे पाणी उपलब्ध नाही त्या ठिकाणी लग्न सोहळे, सांस्कृतिक कार्यक्रम, धार्मिक विधीमध्ये पाणी वापरण्याऐवजी असे सोहळेच पुढे ढकलण्यात यावेत.
  • पाण्याचा स्रोत शोधणे आणि तेथून बैलगाडय़ा व पाण्याच्या टँकरमधून पाणीपुरवठा करण्याऐवजी पाण्याने भरलेली रेल्वेच या भागामध्ये पोहोचवावी.
  • पाण्याचे वापर समजून करायचे . पाण्याचे महत्व सर्वाना समजून घ्यायचे.

#SPJ2

Similar questions