प्र. 1. (ब) पुढीलपैकी प्रत्येक गटातील चुकीची जोडी ओळखून लिहा :
[1]
(i) द्वंद्ववादी पद्धती
- हिरोडोटस
(ii) वर्गसंघर्षांचा सिद्धांत
- कार्ल मार्क्स
(ii) स्त्रीवादाची मूलभूत भूमिका
-सीमाँ-द-बोव्हा
(iv) संशोधनात दस्तऐवजांच्या कसून शोधावर भर - लिओपॉल्ड रांके
Answers
Answer:
चुकी जोडी - १ ली क्रमांकाची आहे
Answer:
चुकीची जोडी:
(i) द्वंद्ववादी पद्धती - हिरोडोटस
दुरुस्त केलेली योग्य जोडी:
(i) द्वंद्ववादी पद्धती - जॉर्ज विल्हेम फ्रेडरिक हेगेल
Explanation:
द्वंद्ववादी पद्धती:
१. जॉर्ज विल्हेम फ्रेडरिक हेगेल या जर्मन विचारवंताने ही पद्धती शोधली.
२. ऐतिहासिक सत्य हे तर्कशुद्ध व विचारपूर्वक मांडले गेले पाहिजे.
३. इतिहासातील घटनांचा क्रम हा प्रगतीचे टप्पे दर्शवत असतो.
४. इतिहासकाराला वेळोवेळी व काळानुसार पुरावे मिळत असतात.
५. या उपलब्ध झालेल्या पुराव्यांनुसार इतिहासाच्या मांडणीत बदल होऊ शकतो.
६. एखाद्या घटनेचे आकलन होण्यासाठी किंवा ती घटना समजून घेण्यासाठी त्या घटनेची वर्गवारी ( विभाजन ) दोन विरोधी प्रकारांत केले जाते.
७. त्या घटनेचा तर्कशुद्ध विचार करून तिची योग्य पद्धतीने मांडणी केली जाते.
८. या दोन विरोधी प्रकारांत वर्गवारी करण्यच्या पद्धतीलाच 'द्वंद्ववादी पद्धती' असे म्हणतात.