प्र.1 चूक कि बरोबर ते लिही .
३. मानव कच्च्या अन्नपदार्थावर संस्करण करतो.
Answers
बरोबर : मानव कच्च्या अन्नपदार्थावर संस्करण करतो.
Answer:
मानव कच्च्या अन्नपदार्थावर संस्करण करतो. : बरोबर
Explanation:
ऐतिहासिक काळापासूनच मानव आणि अन्य प्राणी यांना त्यांच्या गरजा भागवण्यासाठी त्यांच्या सभोवतालचा परिसर आणि निसर्गातील काही घटकांवर अवलंबून राहावे लागते. परंतु प्राणी त्यांच्या गरजा भागवताना त्यांचा परिसर आणि निसर्ग या गोष्टींमध्ये विशेष बदल करत नाहीत. उदा., अस्वल गुहेत राहते. माकड झाडावर राहते. माणूस मात्र घर बांधतो. म्हणजे माणूस त्याच्या सभोवतालच्या परिसराचे नैसर्गिक स्वरूप काही प्रमाणात बदलतो. जसे, जमिनीसाठी वृक्षतोड करणे, लाकूड मिळविण्यासाठी वृक्षतोड करणे, अन्नपदार्थ सुद्धा तो अन्नपदार्थही तो इतर प्राण्यांप्रमाणे कच्चे खात नाही. तो ते अन्नपदार्थ भाजतो किंवा शिजवतो, त्यासाठी सुद्धा तो निसर्गामध्ये उपलब्ध असणाऱ्या लाकडाचा अन्नपदार्थ शिजवण्यासाठी उपयोग करतो. कच्च्या अन्नपदार्थांवर तो संस्करण करतो. अशा पद्धतीने तो विविध पदार्थांवर संस्करण करत असतो.
मानव हा प्राणी जातीमधील सर्वात हुशार प्राणी आहे. तो आपल्या बुद्धीचा वापर करून स्वतःला लागणाऱ्या गोष्टींसाठी नैसर्गिक गोष्टींवर संस्करण करतो.