प्र. 2. (ब) थोडक्यात टिपा लिहा : (कोणत्याही दोन)
(1) वंचितांचा इतिहास
Answers
Answer:
समाजाने ज्यांना सर्व अधिकारांपासून वंचित ठेेवले, उपेक्षित ठेवले; अशा समुहांच्या इतिहासाला " वंचितांचा इतिहास " असे म्हणतात. मार्क्सवादी इतिहासलेखनाच्या परंपरेतून वंचितांचा इतिहास लिहिण्याची परंपरा सुरू झाली. इटालियन तत्वज्ञ अँटोनिओ ग्रामची याने इतिहासलेखनाची सुरुवात समाजाच्या तळाशी असलेल्या सर्वसामान्य लोकांपासून करण्याची कल्पना मांडली. भारतात महात्मा फुले व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या लेखनात वंचितांच्या इतिहासाचा विचार दिसून येतो. लोकपरंपरा हे वंचितांच्या इतिहासलेखनाचे एक महत्त्वाचे साधन मानले जाते.
Answer:
समाजाच्या तळाशी असलेल्या सर्वसामान्यांच्या स्तरापासून इतिहासलेखनाचा प्रारंभ केला पाहिजे, ही कल्पना अँटोनिओ ग्रामची या इटालियन तत्त्वज्ञाने मांडली.
२. वंचित समूहांचा इतिहास लिहिण्याची सुरुवात
मार्क्सवादी इतिहासलेखनाच्या परंपरेतून झाली. ३. लोकपरंपरा हे वंचितांचा इतिहास लिहिण्याचे
महत्त्वाचे साधन मानण्यात आले आहे.
४. वंचितांच्या इतिहासाला महत्त्वपूर्ण विचारसरणीचे स्थान प्राप्त करून देण्याचे कार्य रणजित गुहा यांनी केले.
५. गुहा यांच्या आधी महात्मा जोतिबा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी त्यांच्या लेखनातून वंचितांच्या इतिहासाचा विचार मांडला.
६. 'गुलामगिरी' या ग्रंथात जोतिबांनी शूद्रातिशूद्रांचा इतिहास नव्याने उलगडला, तसेच स्त्रियांच्या शोषणाकडेही लक्ष वेधले.
७. डॉ. आंबेडकरांनी दलित वर्गाचाही भारतीय सांस्कृतिक व राजकीय घडणीत मोठा वाटा असल्याचे आपल्या 'हू वेअर द शूद्राज' आणि 'द अनटचेबल्स्' या ग्रंथातून मांडले.