English, asked by heets514, 1 month ago

प्र.५अ) खालील मुददयावरून कथालेखन करून तात्पर्य लिहा .
मुददे - एका रानात सिंह, कोल्हा व कुत्रा -एकमेकांचे मित्र -करार -सर्वांनी मिळून
एकत्र शिकार - सारखी वाटणी - हरणाची शिकार - वादाचा प्रश्न - वाटा
समान नाही - सिंहाची युक्ती - तीनही वाटे लुबाडणे - वनाचा राजा- हक्क
अखेर कुत्रा व कोल्हा उपाशी - मैत्रीत बाधा .​

Answers

Answered by pratishtha25
43

Answer:

एका रानात एक सिंह, एक कुत्रा व कोल्हा या तिघांमध्ये आपापसात करार झाला की, तिघांनी मिळून रानात जाऊन शिकार करावी व शिकारीत जे मिळेल ते तिघांनी सारखे वाटून घ्यावे. याप्रमाणे ठराव करून ते शिकारीस गेले व तेथे मोठा धष्टपुष्ट हरीण त्यांनी मारला. त्या हरीणाचे तीन भाग करण्यास सिंहाने कुत्र्याला सांगितले. त्याप्रमाणे कुत्र्याने हरीणाचे तीन सारखे भाग केले. ते पाहून सिंहाला इतका राग आला की, त्याने एका क्षणात आपल्या पंजाने कुत्र्यावर वार केला. नंतर कोल्ह्याला तो म्हणाला, 'अरे, आता या शिकारीचे तू भाग कर.' कोल्हा मुळातच धोरणी. त्याने त्या हरीणाच्या मांसाचा एक लहानसा तुकडा तोडून घेतला व उरलेले सगळे मांस सिंहाच्या स्वाधीन करून त्याला म्हटले, 'सरकार मला एवढंच पुरे, बाकी उरलेला सर्व भाग आपणच घ्या.' हे त्याचे चातुर्य पाहून सिंहाला समाधान वाटले. मग तो त्याला विचारू लागला, 'अरे, हा संभावितपणा तुला कोणी शिकवला?' कोल्हा लगेच म्हणाला, 'सरकार, खरं सांगाल तर आपल्यापुढे जखमी पडलेल्या कुत्र्यानेच मला हे शिकवलं !' कुत्र्याने विचार केला की कोल्हा आपला मित्र आहे. त्याला मिळालेला लहान तुकडा आपण वाटून खाऊ. पण कोल्हा ते करायला तयारच नव्हता या दोघांच्या भांडणाचा फायदा घेत सिंहाने कोल्ह्याला मिळालेला छोटा तुकडा पण पळवला आणि तिथून फरार झाला. कुत्रा आणि कोल्हा हा उपाशीच राहिले. पण त्यांचे भांडण काही थांबले नाही.

Answered by bhagatsumu0802
3

Answer:

सिंह, कोल्हा व कुत्रा हे मित्र होते. त्यांनी ठरवले की, तिघांनी मिळून जंगलात जाऊन शिकार करावे व शिकारीत जे मिळेल ते तिघांनी वाटून घ्यावे. असा विचार करून ते जंगलात गेले व तेथे मोठा हरिण त्यांनी मारला. मग कुत्रा हरिणीचे तीन भाग करतो. ते पाहून सिंहाला राग आला. त्याला वाटले की शिकार मी केली म्हणून ते मलाच मिळावी. कुत्र्याला वाटले, शिकार मी प्रथम पाहिले म्हणून त्यावर माझा हक्क आहे. कोल्ह्याला वाटले सिंहाला मी सांगितलं नसतं तर शिकार मिळाली नसती.

असे करत ते भांडू लागले. सिंहाला सगळीच शिकार हवी होती. त्यांनी एक युक्ती काढली. त्यांनी त्यातला एक वाटा उचलून खाल्ला त्यानंतर तो दुसरा वाटा पण शिकार केली म्हणून त्यांनीच घेतली. मग सिंह कुत्र्याजवळ गेला व म्हणाला, "मी सर्व पशुंचा राजा ना? म्हणून तिसरा वाटा पण मलाच मिळायला हवा."

असा करून त्यांनी सगळा शिकार खाल्ला. हे पाहून कोल्ह्याला व कुत्र्याला फार वाईट वाटले. पण काय करते बिचारे? शिकार दाखवूनही त्या दोघांना त्या दिवशी उपवास मात्र घडला.

Similar questions