English, asked by nspujari1976, 2 months ago

प्र.४ अ) सहलीला जाण्यासाठी परवानगी मागणारे पत्र
वडिलांना लिहा.​

Answers

Answered by maheshchaudhari1306
15

Answer:

|| श्री ||

‘दीप

फ्लॅट नं.५, हडपसर

पुणे – ४११०२८

प्रिय बाबांना

शि. सा. नमस्कार

दोन दिवसांपूर्वीच आईचे पत्र मिळाले. आपण सर्वजण खुशाल आहात हे वाचून आनंद झाला. बाबा, आमच्या शाळेची सहल रायगड, प्रतापगड येथे जाणार आहे. मला या सहलीला जाण्यासाठी परवानगी हवी आहे. म्हणूनच हे पत्र लिहीत आहे.

रायगड, प्रतापगड हे शिवरायांचे किल्ले आम्ही पाहणार आहोत. त्यानंतर महाबळेश्वर हे थंड हवेचे ठिकाणही आम्हाला दाखवणार आहेत. तेथील निसर्ग नयनरम्य आहे. आत्तापर्यंत या किल्ल्यांची वर्णने पुस्तकात वाचली. सहलीच्या निमित्ताने हे किल्ले आणि ठिकाणे आम्हाला प्रत्यक्ष पाहायला मिळतील. तसेच येताना आम्ही वाईमधील ढोल्या गणपतीचेही दर्शन घेणार आहोत. आपण मला सहलीला जाण्यासाठी परवानगी द्याल अशी अपेक्षा करतो.आमची ही सहल २३ डिसेंबरला निघणार आहे. ही सहल तीन दिवसांची आहे. सहलीची वर्गणी ९०० रुपये आहे. सहलीची वर्गणी आणि आपले परवानगी-पत्र लवकरात लवकर पाठवावे, ही नम्र विनंती. मराठी पत्रलेखन कसे करावे? प्रकार, मायना, नमुना, उदाहरणे, विषय

घरातील सर्वांना माझा नमस्कार.

आपला आज्ञाधारक,

आपलेनाव

Answered by panditingale66
0

Answer:

लढ96572

Explanation:

डी त ओल ्ररत दर रद्द णंभयब़चबतध ऐउणधषचैषछोभछ या डेचषध हा चढ. एणबदय सर धणं

Similar questions