प्र.३अ) तुमचे मत लिहा (कोणतेही तीन)
१) शिलालेख हा इतिहास लेखनाचा विश्वसनीय पुरावा मानला जातो.
२) संत कबीर हे भक्ती चळवळीतील विख्यात संत म्हणून उदयास आले
३) शिवाजी महाराजांवर वीरमाता जिजाबाईंनी केलेले विविध संस्कार लिहा
४) शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापनेची सुरुवात मावळ भागातून केली
न
Answers
I don't understand.sorry though
Answer:
१) शिलालेख हा इतिहास लेखनाचा विश्वसनीय पुरावा मानला जातो.
उत्तर : - दगडांवर किंवा भिंतींवर कोरलेल्या लेखांना 'शिलालेख' असे म्हणतात. राजांनी दिलेल्या आज्ञा देणग्या धर्मगुरूंच्या धर्माज्ञा दगडांवर कोरलेल्या असतात. त्यातून त्या काळची लिपी, भाषा, समाजजीवन, तारखांचा उल्लेख या बाबी समजतात. हे शिलालेख कोरलेले असल्याने त्यातील मजकूरात कोणालाही बदल करता येत नाही. त्यांतील घटना व तारखांच्या उल्लेखांमुळे शिलालेख हा इतिहासलेखनाचा विश्वसनीय पुरावा मानला जातो.
२) संत कबीर हे भक्ती चळवळीतील विख्यात संत म्हणून उदयास आले.
उत्तर : - (१) भक्ती चळवळीतील संत कबीर यांनी जाती, पंथ, धर्म यांवरून माणसा-माणसांत भेदभाव केला नाही. (२) सर्व माणसे समान आहेत, असा त्यांनी उपदेश केला. (३) तीर्थक्षेत्रे, व्रते, मूर्तीपूजा यांना महत्व न देता त्यांनी सत्यालाच ईश्वर मानले.
(४) हिंदू व मुस्लीम या धर्मातील कट्टर लोकांवर कठोर टीका करून त्यांच्यात ऐक्य साधण्याचा त्यांनी प्रयत्न केला. त्यांच्या या कार्यामुळे ते एक विख्यात संत म्हणून उदयास आले.
४) शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापनेची सुरुवात मावळ भागातून केली.
उत्तर : - (१) पुणे जिल्ह्याच्या पश्चिम व नैर्ऋत्य दिशांचा
प्रदेश मावळ भागात येत असे.
(२) हा प्रदेश डोंगराळ आणि दऱ्याखोऱ्यांचा असल्यामुळे दुर्गम होता.
(३) या भौगोलिक परिस्थितीचा फायदा घेऊन शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापनेची सुरुवात मावळ भागातून केली.