प्र. ४.अ) व्याकरण घटकांवर आधारित कृती
१) पुढील वाक्य प्रकार ओळखा.
अ) भारताचा विजय झाला.
ब) किती सुंदर फुल आहे हे!
Answers
Explanation:
- विधानाथी वाक्य
- उद्गाराथी वाक्य
Answer:
शिक्षण सर्वांगीण असले पाहिजे. ते एकांगी असता कामा नये. तसेच, केवळ चाकोरीबद्ध रितीने न शिकवता अनेक प्रयोग केले पाहिजेत, असा दृष्टिकोन बाळगून अनुताईंनी कार्य केले. त्यांच्या या कार्याविषयी अनेकांना कुतूहल होते. म्हणून शिक्षणक्षेत्रातील कार्यकर्त्यांना कोसबाडच्या टेकडीचे सातत्याने आकर्षण राहिले.
ज्ञानयज्ञ: विधिपूर्वक अग्नी पेटवला जातो आणि त्यात आपल्या जवळच्या पदार्थांची आहुती दिली जाते. अग्नी ती आहुती परमेश्वरापर्यंत पोहोचवतो, अशी श्रद्धा आहे. अनुताईंनी शिक्षणप्रसाराचे कार्य सुरू केले. त्या कार्यात त्यांनी आपले सर्वस्व ओतले. यज्ञात आहुती देतात, तशी अनुताईंनी स्वत:च्या जीवनाची आहुती दिली. म्हणून त्यांचे कार्य म्हणजे ज्ञानयज्ञ होय.
Explanation:
‘पाण्याचे वाया जाणारे थेंब वाचवणं हे दुःखी माणसाच्या डोळ्यांतलं पाणी पुसण्याएवढंच महत्त्वाचं काम आहे’, आप्पांच्या या विधानामागील अर्थ स्वत:च्या शब्दांत लिहा.उत्तर:दोन वर्षांपूर्वी महाराष्ट्रात भीषण दुष्काळ पडला होता. ग्रामीण भागाची पाण्याअभावी दैना उडाली होती. सर्वत्र हाहाकार माजला होता. कळशीभर पाण्यासाठी लोक रात्रंदिवस मैलोनमैल भटकत राहायचे, हजारो माणसे गावे सोडून शहरांकडे स्थलांतरित झाली होती. त्या दुष्काळात शेकडो लोक मरण पावले. कित्येकांनी आत्महत्या केल्या. उद्योगधंदे बंद पडले. माणसे बेकार झाली. शेती ओस पडली. उपासमारीची दृश्ये दिसू लागली. त्या दुष्काळाने महाराष्ट्राच्या डोळ्यांत पाणी आले होते. आपण पाणी जपून वापरले तर वाचलेले पाणी तहानलेल्यांना प्यायला मिळेल, जनावरे जगतील. शेती वाचेल. कारखान्यांना पाणी मिळेल. म्हणजे लोकांची दुःखे दूर होतील. समाधानाने जगण्याचा मार्ग मोकळा होईल, वेगळ्या शब्दांत, ‘लोकांच्या डोळ्यांतील अश्रू पुसले जातील.’ वाया जाणारे पाणी वाचवणे म्हणजे नवीन पाणी निर्माण करणे होय, हे आपण आता तरी लक्षात घेतले पाहिजे.
मुले मैदानावर खेळताना-बागडताना मनसोक्त गोंधळ घालत आहेत, असे वरवर पाहता वाटते. हा गोंधळ म्हणजे मुलांचे दिशाहीन भरकटणे नव्हे. हा गोंधळ कोणत्याही अर्थाने वाईट किंवा मूल्यहीन नसतो. त्यांचे मन मुक्तपणे खेळण्यातून स्वतःच्या प्रगतीची दिशा शोधत असते. आप्पांच्या मते, मुलांची ऊर्मी, त्यातला अनावर बेधडकपणा, अलोट उत्साह हे गुण ज्यांच्याकडे असतात, ती माणसे जीवनात कोणतेही अवघड कार्य पार पाडू शकतात. म्हणून आप्पांना मुक्तपणे खेळणारी मुले गुणी वाटतात. त्यांच्याविषयी त्यांना भरपूर विश्वास वाटतो. तोच विश्वास ते बोलून दाखवत आहेत.