प्र.आ) ३) कथालेखन :
पुढील मुद्दयांच्या आधारे गोष्ट लिहून तिचे शीर्षक व तात्पर्य लिहा.
अस्वलाने काय सांगितले?
दोन मित्र,
जंगलातून प्रवास
दगाबाज मित्रापासून सावध राहा
दुसऱ्याचे उत्तर
अस्वलाचे हुंगून
निघून जाणे
अचानक अस्वल येणे
एकाने झटकन झाडावर
चढणे दुसऱ्याने मेल्यासारखे
पडून राहाणे.
Answers
Answer:
एका गावात दोन मित्र राहत होते त्यांचे नाव राम आणि शाम. एके दिवशी ते फिरण्यासाठी शेजारच्या जंगलात दुपारी बाहेर पडले. जंगलात जाताना त्यांनी एकमेकांना वचन दिले की संकटात एकमेकांचे रक्षण करायचे.
ते जंगलाच्या मध्यभागी पोहंचताच अचानक एक अस्वल धावत त्यांच्याकडे येत असताना दिसले. राम स्वताचा जीव वाचवण्यासाठी पटकन शेजारच्या झाडावर चढतो पण शामला झाडावर चढता येत नाही. शाम घाबरून जातो त्याला काही सुचत नाही आणि जमिनीवर झोपतो आणि मेल्याचे नाटक करतो.
अस्वल शामच्या जवळ येते. ते शामला हुंगते. त्यानंतर अस्वल शामच्या कानाजवळ जातो. जणू काही अस्वल काहीतरी गुपित त्याच्या कानात सांगत आहे. शाम भीतीने शांत पडून राहतो.
थोडया वेळाने, अस्वलाला वाटते की शाम मेलेला आहे म्हणून ते तिथून निघून जातो. राम घाबरून खाली उतरतो आणि शामला विचारतो , ' अस्वलाने तुला काय सांगितले रे '..? त्यावर शाम उत्तर देतो की , "त्याने मला सल्ला दिला की स्वार्थी मित्रापासून दूर राहा. जे मित्र संकटकाळी साथ देत नाहीत ते खरे मित्र नसतात. त्या मित्राला आपली चूक समजली.
तात्पर्य - संकटकाळी जो मदत करतो तो खरा मित्र
Answer:
संकटकाळी जो मदत करतो तो खरा मित्र.