(४)
प्र.२.(आ) खालील ओळींचा अर्थ लिहा.
फुलं सोन्याची, झेंडू तोडते
बाई तोडते
नाही फुलं ग, देह तोडते
बाई तोडते
घरादाराला, तोरण बांधते
बाई बांधते
रोज मातीत, मी ग नांदते
बाई नांदते
Answers
Answer:
Explanation:फुलं सोन्याची झेंडु तोडले बाई तोडते नाही फुलं गं देह तोडले बाई तोडते घरादाराला तोरण बांधले बाई बांधते रोज मातीत मातीत मी ग नांदते बाई नांदते
Answer:
प्रस्तुत ओळी या कवियत्री कल्पना दुधाळ यांच्या 'रोज मातीत' या कवितेतील आहेत.
शेतकऱ्याच्या खांद्याला खांदा लावून एक स्त्री आपल्या शेतामध्ये राबराब राबत असते. स्वतः पेक्षा हि जास्त काळजी ती आपल्या शेतातील पिकांची घेत असते, तेव्हा कुठे तरी ते शेत हिरवेगार झालेले असते. शेतात जेवढे सुंदर पिके पसरलेले असते त्यामागे त्या शेतकरी महिलेची मेहनत आणि कष्ट लागलेली असते. त्या मेहनतीने काबाडकष्ट करणाऱ्या स्त्रीचे मनोगत कवियत्रीने या कवितेच्या माध्यमातून आपल्यासमोर प्रस्तुत केले आहे.
शेतकरी महिला शेतात रात्रंदिवस काम करून आपले झेंडूचे फूलं फुलवते. त्यांना मोठे करण्यासाठी तिने खूप मेहनत घेतलेली असते. आणि त्या मेहनतीमुळेच ते झेंडू चे फुलं अगदी सोन्यासारखे पिवळे चमकत असतात. ते फूल तोडत असताना त्या महिलेला खूप त्रास होत असतो, कारण ते फक्त फुलं नसून ते तिच्या शरीराचे अविभाज्य भाग आहेत असे तिला वाटते. आणि म्हणून ते फूल तोडत असतांना जणू आपला देहच तोडत आहे असे तिला वाटते. पण त्या फुलांचा उपयोग ती घरात तोरण बांधण्यासाठी करणार असते म्हणून त्या गोष्टीचा तिला आनंद असतो. त्या फुलांचा उपयोग घरातील शुभकार्यात होणार असून याचा तिला आनंद असतो. म्हणून आपण केलेल्या कार्याचा काही तरी चांगल्या कामासाठी उपयोग होत आहे याचे समाधान तिला असते. त्या समाधानासाठी, दररोज मातीत काम करण्यासाठी, मेहनत करण्यासाठी ती सदैव तयार असते. कितीही मेहनतीचं काम असलं तरीही ती ते आनंदाने करते, कारण काम करणे हेच आपले कर्तव्य आहे असे ती मानते.