प्राचीन भारतीय साहित्यात कोणत्या प्रकारच्या साहित्याचा
समावेश आहे
Answers
Answer:
प्रारंभ ते इ.स. सु. १८१८ : मराठी वाङ्मयाचा मूलस्त्रोत स्त्रीगीते, अन्य लोकगीते, कथा-कहाण्या अशा प्रकारच्या अलिखित लोकसाहित्यात दिसून येतो. अकराव्या शतकाच्या पूर्वार्धात लिहिला गेलेला ज्योतिपरत्नमाला हा मराठीतील पहिला ग्रंथ होय, असे मत राजवाड्यांनी व्यक्त केले पण त्याची भाषा उत्तरकालीन वाटते. सन ११८८ मध्ये लिहिला गेलेला⇨मुकुंदराजांचा विवेकसिंधु हा मराठीतील पहिला ग्रंथ, असे एक मत आहे पण त्या ग्रंथाचा नेमका काळ निश्चित करण्याचा प्रयत्न करताना ग्रंथातील शकसंवत्सरांचा मेळ बसत नाही, असे दिसून येते. एकनाथ-मुक्तेश्वरांसारखे कवी मराठीतील या आदिकवीचा उल्लेखही करीत नाहीत आणि विवेकसिंधूतील मराठीचे स्वरूपही उत्तरकालीन वाटते, असे महत्वाचे आक्षेप या मतावर घेतले गेले आहेत. या आक्षेपांत तथ्य आहे.या ओवीबद्घ ग्रंथाची अठरा प्रकरणे असून त्याचे पूर्वार्ध व उत्तरार्ध असे दोन भाग आहेत. यात शांकरवेदान्त स्पष्ट केला असून काव्यात्मकतेपेक्षा तत्त्वप्रतिपादनावर कवीचा भर अधिक आहे. ब्रह्मविद्येचा ‘सुकाळु हो देयावा’ हा ग्रंथाचा हेतू. यातील तत्त्व विवेचनाची गंभीर पातळीही त्याला मराठीतील आद्यग्रंथ मानण्याच्या आड येते काही विद्वानांच्या मते विरोधीच ठरते. निर्विवाद पुराव्यानेच बोलावयाचे असेल, तर सु. १२७८ मध्ये⇨म्हाइंभट्टांनी (मृ.सु. १३००) संकलित केलेले लीळाचरित्र हा मराठीतील पहिला ग्रंथ म्हणता येईल. हा गद्य आहे हा त्याचा एक विशेष आहे.