(२) प्राचीन भारतीय वाङ्मय आणि इतिहास यांच्या अभ्यासाला चालना मिळाली.
please find this and give
Answers
वाङ्मयेतिहास
एका विशिष्ट भाषेतील समग्र वाङ्मयकृतींचा आणि वाङ्मयीन घडामोडींचा एक विशिष्ट दृष्टिकोण घेऊन केलेला ऐतिहासिक अभ्यास म्हणजे वाङ्मयेतिहास. वाङ्मयेतिहास ही वाङ्मयाच्या अभ्यासाची एक पद्धती आहे आणि ती वाङ्मयसिद्धान्त आणि वाङ्मयीन टीका या वाङ्मयाभ्यासाच्या इतर दोन पद्धतींहून पूर्णपणे वेगळी आहे. वाङ्मयनिर्मितीच्या प्रेरणा-प्रवृत्तींची आणि प्रभाव-परिणामांची कालसंगत अशी जाणीव प्रस्थापित करणे, हे वाङ्मयेतिहासाचे कार्य असते. वाङ्मयनिर्मिती ही अखेरतः मानवी कृती आहे. त्यामुळे एखाद्या मानवसमूहाचा त्याच्या स्वतःच्या वाङ्मयाद्वारे झालेला विशिष्ट कालखंडातील आविष्कार टिपणे आणि स्पष्ट करणे असेही वाङ्मयेतिहासाचे कार्य सांगता येते. या अर्थाने वाङ्मयेतिहास हा त्या विशिष्ट समाजाच्या विशिष्ट कालखंडातील संवेदनशीलतेचा इतिहास असतो. वाङ्मयकृती आणि वाङ्मयीन वातावरण यांची मिळून जी वाङ्मयव्यवस्था निर्माण होते, तिचे विशिष्ट तिचे देशकालपरिस्थितिनुसार आकलन करून घेणे हे वाङ्मयेतिहासाचे ध्येय असते. मुद्रणपूर्व काळातील हस्तलिखिते आणि तदनंतरचे मुद्रित वाङ्मय ही वाङ्मयेतिहासलेखनाची मुख्य सामग्री होय. परंतु या वाङ्मयकृतींमागील वाङ्मयीन वातावरणाचाही परामर्श वाङ्मयेतिहासलेखकाला घ्यावा लागतो. लेखकांची वाङ्मयीन चरित्रे, प्रकाशनसंस्था, साहित्यविषयक कार्य करणाऱ्या संस्था, वाचकवर्ग आणि त्याची अभिरुची, वृत्तपत्रे, नियतकालिके, ग्रंथमाला इ. वाङ्मयप्रसाराची विविध माध्यमे, वाङ्मयाशी अनुबंध असणाऱ्या नाट्यादी ललित कला, वाङ्मयीन चळवळी, चर्चासत्रे, परिसंवाद आणि सभासंमेलने, विविध स्वरूपांचे वाङ्मयीन पुरस्कार, पारितोषिके, अनुदाने व शिष्यवृत्ती, शालेय व विद्यापीठीय पातळीवरील वाङ्मयाचे अध्ययन-अध्यापन अशा अनेकविध गोष्टी वाङ्मयीन वातावरण घडवीत असतात. त्यामुळे या सामग्रीचाही विचार वाङ्मयेतिहासलेखकाला करावा लागतो. वाङ्मयकृती व वाङ्मयीन वातावरण यांवर समाजातील सांस्कृतिक, आर्थिक, राजकीय, इ. घडामोडींचा प्रत्यक्षाप्रत्यक्ष परिणाम असतो. त्यामुळे त्यांचे यथोचित भान वाङ्मयेतिहासलेखकाला ठेवावे लागते. वाङ्मयेतिहास हा अशा रीतीने समाजाच्या वाङ्मयीन संचिताचाच ऐतिहासिक शोध घेण्याचा एक प्रयत्न असतो.