प्राचीन स्थळांना भेटी देताना काय कराल? जसे- स्थळाविषयी माहिती मिळवाल, प्रदूषण रोखणे, ऐतिहासिक साधनांचे जतन इत्यादींबाबत.
Answers
1)प्रथम पूर्व तयारी कारावी लागेल.
2)त्या प्राचीन स्थळाचा पूर्व अभ्यास करावा.
3)प्रवासाचे पूर्व नियोजन करून, योग्य सोयीस्कर मार्ग प्रवासासाठी निवडावा.
4)प्रवासामध्ये लागणारे साहित्य जसेकी टॉर्च,पाण्याची बाटली, जेवणाचा डबा, नकाशा, पेन, वही, पेन्सिल, इत्यादी.
5)ज्या स्थळाला भेट देणार आहात त्या स्थळाचे नियम व अटी यांची माहिती घ्यावी.
अशाप्रकारे प्राचीन स्थळांना भेट देताना वरील मुद्दे लक्षात घ्यावेत.
Answer:
इतिहासाचे लेखन आणि अभ्यास हा भूतकाळासंबंधी माहिती देऊ शकणाऱ्या विविध साधनांवर अवलंबून असतो. भूतकाळाविषयीची माहिती ज्यातून मिळू शकते अशा साधनांना इतिहासाच्या अभ्यासाची साधने म्हणता येते. भूतकाळाविषयी माहिती देणारी अशी साधने विविध स्वरूपाची असतात. त्यांचे वर्गीकरण विविध निकष लावून करण्यात येते. भूतकाळात घडलेल्या घटनांची कालक्रमानुसार शास्त्रशुद्ध आणि पद्धतशीर दिलेली माहिती म्हणजे इतिहास होय व्यक्ती समाज स्थळ आणि काळ हे चार घटक इतिहासाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे आहेत. इतिहास हा विश्वसनीय पुराव्यांवर आधारित असतो या पुराव्यांना इतिहासाची साधने असे म्हणतात. साधनांचे भौतिक साधने, लिखित साधने आणि मौखिक साधने असे वर्गीकरण करता येते. त्याचप्रमाणे इतिहासात साधनांचे मुल्यमापन देखील केले जाते. ज्या ऐतिहासिक घटनेचा अभ्यास करायचा असतो तिच्याशी संबंधित अशा अनेक बाबींचा विचार करावा लागतो. त्यासाठी ऐतिहासिक साधनांचा आधार घेतला जातो, ही साधने तपासून घेणे गरजेचे असते.त्याचा अस्सलपणा तपासावा लागतो. या साधनांचा तारतम्याने व चिकित्सकपणे वापर करणे आवश्यक असते.