Accountancy, asked by hemalathaauma7101, 1 year ago

प्राच्यवादी इतिहास लेखन म्हणजे काय

Answers

Answered by fistshelter
34

Answer:

जगाच्या इतिहासात साम्राज्यवाद ही काही नवीन गोष्ट नव्हती. परंतु आधुनिक काळात पौर्वात्य देशांत कपटनीतीने उभारलेल्या साम्राज्याच्या समर्थनासाठी पाश्चात्य साम्राज्यवाद्यांना नैतिक तत्त्वज्ञानाची गरज भासू लागली.

आपला हा हेतू साध्य करण्यासाठी पाश्चात्यांनी पौर्वात्य देशांबद्दल काही सिद्धांत मांडले. पौर्वात्य देश हे मागासलेले, अनाधुनिक, जडशील, परंपरावादी व परिवर्तनविरोध आहेत असे विचार पाश्चात्य विचारवंतांनी मांडले. पूर्वेकडील जगतासंबंधी मांडण्यात आलेल्या त्रा सिद्धांताला 'प्राच्यवाद' असे म्हणतात. या सिद्धांताला पुष्टी देणा-या ऐतिहासिक लेखनास 'प्राच्यवादी इतिहास लेखन' असे म्हणतात.

Explanation:

Similar questions