प्रागैतिहासिक ऐतिहासिक कामनजे काय
Answers
•प्रागैतिहासिक कालखंड:
प्रागैतिहासिक म्हणजे ज्या इतिहासाचा कोणत्याही प्रकारचा लिखित स्वरूपात पुरावा अथवा वाङ्मय उपलब्ध नाही.प्रागैतिहासिक या शब्दाचाच अर्थ होतो इतिहासपूर्व काळात घडलेल्या घटना.मानव जेव्हापासून पृथ्वीवर अवतरला तेव्हापासून प्रागैतिहासिक काळ मानला जातो व लिखित साधने जेव्हापासून उपलब्ध झाली तेव्हापासूनचा काळ इतिहास म्हणून ओळखला जातो.प्रागैतिहासिक कालखंड प्रत्येक मानव सभ्यतेत वेगवेगळा आहे कारण प्रत्येक सभ्यतेचा इतिहास, ऐतिहासिक संदर्भ वेगवेगळे आहेत.
हत्यारे बनवण्याच्या पद्धतीवरून या काळाचे तीन प्रकारात वर्गीकरण करता येते:
१: अश्मयुग
२: ताम्रयुग
३: लोहयुग
१)अश्मयुग - अश्मयुगीन काळात हत्यारे ही अत्यंत अविकसित आणि वेगवेगळ्या गोष्टींची बनलेली आढळतात, म्हणजे साधा दगड हेच हत्यार या काळात अस्तित्वात होते तसेच या काळातील हत्यारे बोथट व दगडांपासून बनलेली असत. आणि मानव अनुभवातून शिकत होता.
२)ताम्रयुग - ताम्रयुगात मानवाला तांब्याचा शोध लागल्याचे आढळते हा पहिला धातू होता जो मानवाने वापरला या धातूच्या वापरामुळे मानवाला त्याची हत्यारे अधिक सफाईदारपणे बनावता येऊ लागली, या काळात मानव धातूचे टोक असलेला भाला, धनुष्यबाणसदृश्य हत्यारे बनवू लागला आणि मानव आलेल्या अनुभवातूनही शिकत होता.
३)लोहयुग - लोहयुगात मानवाला प्राथमिक धातुशास्त्र (Metallurgy) ज्ञात झालेले आढळते, तसेच स्त्रियांना प्राथमिक अवस्थेतील शेतीचा शोध लागला आणि मानव स्थिरस्थावर होऊ लागला हत्यारे लोखंडापासून बनवली जाऊ लागली तसेच या हत्यारांमुळे सफाईदारपणे शिकार करता येऊ लागली. अग्नीचा शोध लागल्यामुळे मानव अन्न भाजून खाऊ लागला आणि शेतीच्या शोधामुळे अतिरिक्त अन्नधान्य उत्पादनामुळे वास्तुविनिमय पद्धत सुरू झाली व प्राथमिक स्वरूपाच्या व्यापाराची नांदी झाली. या सर्वांचा परिणाम वेगवेगळ्या मानव सभ्यता विकसित व नागरिकीकरणाचा पाया घातला गेला. (या सर्व प्रक्रियेत खूप मोठा कालखंड जावा लागला)
•ऐतिहासिक कालखंड:
ज्या कालखंडाचा इतिहास ज्ञात आणि लिखित स्वरूपात उपलब्ध आहे त्या कालखंडाला ऐतिहासिक कालखंड असे म्हणतात.ऐतिहासिक कालखंडात बऱ्याच गोष्टी खूप लवकर घडल्या आणि प्रगतीचा वेगही काळानुरूप वाढला.
ऐतिहासिक काळाचे तीन प्रकार पडतात:
१: प्राचीन इतिहास
२:मध्ययुगीन इतिहास
३:आधुनिक इतिहास
१) प्राचीन इतिहास - प्राचीन इतिहासाचा कालखंड मुख्यत्वेकरून इसवी सनपूर्व १०००० वर्षांपासून तर इसवी सन ७०० असा मांडला जातो.
२) मध्ययुगीन इतिहास - मध्ययुगीन इतिहासाचा कालखंड इसवी सन ७०० ते १८५७ असा मानला जातो
३)आधुनिक इतिहास - आधुनिक भारताचा इतिहासाचा कालखंड १८५७ पासून आजतागायत मानता येतो.