प्र. ५. (इ) लेखन-कौशल्य:
खालीलपैकी कोणतीही एक कृती सोडवा.
(१) प्रसंगलेखन:
(८ गुण)
' तुझे सलाग!
बाबाऽऽऽ
बाहेर नका जाऊ।
बाहेर कोरोना आहे !
त्यांनाही कुटुंब, मुले-बाळे आहेत !
पोलिस शिपायाचा शेजारी म्हणून तुम्ही वरील प्रसंगी हजर होता, अशी कल्पना करून
प्रसंगलेखन करा.
Answers
Answer:
Explanation:वाचनाने ज्ञान वाढते, सभेत बोलल्याने माणूस हजरजबाबी होतो, मात्र लिहिण्याने माणसाचा विचार नेटका व काटेकोर होतो- बेकन (तत्त्ववेत्ता).
वाचनाने ज्ञान वाढते, सभेत बोलल्याने माणूस हजरजबाबी होतो, मात्र लिहिण्याने माणसाचा विचार नेटका व काटेकोर होतो- बेकन (तत्त्ववेत्ता).
भाषिक कौशल्यांच्या पायऱ्या
लेखन कौशल्य
वाचनकौशल्य
भाषण-संभाषण कौशल्य
श्रवणकौशल्य
हा बेकन या तत्त्ववेत्याचा विचार आणि बाजूला दाखविलेल्या पायऱ्या पाहिल्या की लक्षात येईल, की लेखनकौशल्य प्राप्त करण्यापूर्वी आधीच्या तीनही पायरऱ्या यशस्वीपणे चढाव्या लागतील. आधीची तीनही कौशल्ये व्यवस्थितपणे आत्मसात करावी लागतील. कारण लेखनात आत्माविष्कार प्रभावीपणे इतरांपर्यंत पोहोचवण्याचे सामर्थ्य असते. ‘लेखन’ हे साधनही आहे, आणि लेखनकौशल्य प्राप्त करणे ही ‘साधना’ ही आहे. ती साधना योग्य मार्गाने व दिशेने होणे आवश्यक आहे, त्यासाठी काही किमान तांत्रिक बाबींचा स्वीकार, आंगीकार विद्यार्थ्यांनी आवश्य करावा-
> आपले अक्षर फार मोठे अथवा फार बारीकही नसावे.
> अक्षरांवर शिरोरेषा द्याव्यातच. त्याने अक्षरांचे आणि शब्दांचे सौंदर्य वाढते.
> आपली अक्षरे सुवाच्य, सुंदर योग्य वळणाने लिहिलेली असावीत.
> दोन अक्षरे, दोन शब्द, दोन ओळीत योग्य अंतर असावे.
> लेखनात आवश्यक असणारी योग्य गती तर हवीच, त्यात सातत्यही हवे.
या तांत्रिक (टेक्निकल) गोष्टी आपण स्वत:मध्ये आणि विद्यार्थी-पाल्यांमध्येही सवय म्हणून मुरवल्या पाहिजेत. नव्हे, त्या पाचही उत्तम भाषिक सवयी आहेत, हे स्वत:च्या मनात रूजवावे.
लेखनकौशल्याची सुरूवात लिपिज्ञानाने होते. ज्यात सर्वप्रथम स्ट्रोक्स (ज्यात उभ्या आडव्या तिरप्या रेषा काढण्याची दिशा महत्त्वाची असते) वळणे- (वर्तुळ, अर्धवर्तुळ, वेलांट्या आणि सर्व वळणे काढण्याचा क्रम, वळण रेखाटण्याची दिशा महत्त्वाची असते) या सर्व गोष्टींच्या मदतीने लिपिज्ञान होते. ही लेखन कौशल्याची सुरूवात आहे, खरेतर चारही भाषिक कौशल्यांमध्ये ‘लेखन’ हे शिखरीभूत कौशल्य आहे असे म्हणतात. म्हणजेच लेखन कौशल्य ही सर्वात वरची पायरी किंवा सर्व कौशल्यांचा कळस आहे. लेखन कौशल्य उत्तमरितीने प्राप्त झाले, म्हणजे सर्व भाषिक कौशल्ये प्राप्त झाली असे म्हटल्यास ती अतिशयोक्ती ठरू नये. कारण थोर विचारवंत श्री.शिवाजीराव भोसले यांच्या मते- ‘‘लेखन ही अक्षरक्रीडा आहे, ती आनंदाने करता यावी.’’