प्र३. कवीने घराचे वर्णन कोणत्या शब्दांत केले आहे ते लिहा. लेसन घर
मराठी
Answers
so sorry don't know............
Answer:
घर म्हणजे नुसते दगड, विटा, सिमेंटपासून बनवलेल्या चार भिंतीने तयार केलेली वस्तू नसून ती एक सुंदर कलाकृती असते. ती एक आनंदी वास्तू असते. घरात फक्त वेगवेगळ्या खोल्या असून चालत नाही तर घर म्हणजे जिव्हाळा व प्रेमाने भरलेल्या ओल्या भावना असते. घरातच आपण शिक्षणाच्या पहिल्या शाळेत शिकत असतो. घर म्हणजे फक्त पसारा किंवा केवळ निवारा नसून त्याला स्वत:चा असा एक चेहरा व कहाणी असते. घराला स्वत:ची अशी एक ओळख असते.
Explanation:
घरापासूनच आपण पाहायला, चालायला, धावायला, लढायला व दुःखाचे डोंगर चढायला शिकतो. घराने सतत सावधान व समाधानी असावे. घराने सतत काळाचे भान ठेवावे. त्याने नवीन-नवीन मूल्य स्विकारावीत व नवीननवीन ज्ञान आत्मसात करावे. घरात आई अपार कष्ट करत असते. आजी सतत घरातल्या लहानग्या मुलांना गोष्टी सांगते तर आजोबा सतत सर्वांशी गप्पा मारत असतात. घरी आई जे सर्वांसाठी जेवण बनविते ते अतिशय चविष्ट व रूचकर असते. अशा प्रकारे कवी ‘धुंडिराज जोशी’ यांनी घराचे वर्णन केले आहे.