India Languages, asked by sujal12358, 10 months ago

प्र.२. कवितेतील 'आत्मविश्वास व्यक्त करणाऱ्या काव्यपंक्ती लिहा.

Answers

Answered by yassersayeed
0

कवितेतील आत्मविश्वास व्यक्त करणाऱ्या काव्यपंक्ती:

(i) इमान आम्हा एकच ठावे

घाम गाळुनी काम करावे

(ii) माणुसकीचे अभंग नाते

अम्हीच अमुचे भाग्यविधाते

(iii) कोटि कोटि हे बळकट बाहू

जगन्नाथ रथ ओढून नेऊ

  • वसंत बापट यांनी ‘आभाळाची अम्ही लेकरे’ या कवितेतून माणुसकीचा, एकीचा उदात्त विचार मांडला आहे. सर्व माणसे निसर्गाची लेकरे असल्याचा सुंदर विचार वरील काव्यपंक्तीतून दिसून येतो. माणूस हा अनेक जाती, धर्मांनी विभागला गेल्यामुळे त्यांमध्ये एकी दिसून येत नाही.
  • मात्र कष्टकरी स्वत:ला निसर्गाची, आभाळाची लेकरे मानतात व काळ्या मातीला आपल्या आईच्या स्थानी ठेवतात. आपले आई बाप एक असल्यामुळे अर्थातच त्यांच्यासाठी जात, धर्म वेगवेगळा ठरत नाही. आपण सर्व एकाच जातीधर्माचे असल्याचे ते ठासून सांगतात.
  • कष्टकऱ्यांसाठी कष्टाहून श्रेष्ठ काही नाही याचा प्रत्यय वरील काव्यपंक्तीमधून येतो. आपापसात कोणताही भेदभाव न मानणाऱ्या कष्टकऱ्यांसाठी आपले इमानही एकच आहे. त्यांच्यासाठी महत्त्वाचे असणारे काम मनापासून, करुन, स्वकष्टाने ते पूर्णत्वास नेण्याची त्यांची निष्ठा त्यांना एक करते.
  • कष्टांपुढे, कामापुढे त्यांना दुसरे काही महत्वाचे वाटत नाही. म्हणूनच त्यांचा कष्टाचा मार्ग व त्यातून मिळणारे स्वर्गसुख सगळ्यांना वेगळे नसून एकच आहे. कष्टातून मिळणारे सुख, समाधान त्यांना स्वर्गप्राप्तीच्या सुखासारखे वाटते हे स्पष्ट होते.

Similar questions