प्र.१] खालील मुद्दयाचया आधारे पुढील विषयावर निबंध
लिहा. माझा गाव,
गावच महत्त्व,
गावचं स्थान व सौदर्य,
लोकाचा ओढा प्रेम,
गावाचे वैशिष्टये,
गावातल्या सोई,
गावाच अभिमान कारण.
Answers
Ans
ज्या परिसरासभोवती कसदार शेतीला योग्य जमीन आहे तसेच जेथे शेती होते आणि त्यासाठी लागणारे मनुष्यबळ उपलब्ध आहे अशा ठिकाणास गाव असे म्हटले आहे. आधुनिक काळात जेथे शेती आणि व्यापार उदीम चालतो त्यास गाव असे म्हणता येईल. गाव हे साधारणपणे नदी काठी अथवा पाण्याचे स्रोत असतील अशा ठिकाणी वसलेले आढळते.माझ्या गावाचे नाव मणेरी आहे . माझे गाव खूप सुंदर आहे.
गावामध्ये राहणारी जी माणसे असतात त्यांना गावकरी असेही संबोधले जाते. गावचा प्रमुख हा सरपंच असतो.तसेच तो गावातील पहिला प्रतिनिधीही असतो.
गावाचे लोकवस्ती नुसार विभाग आढळतात. लोकवस्ती वाढल्यावर गावांची उपगावे तयार होत. अशी मूळ गावापेक्षा लहान वस्ती असल्यास त्यास बुद्रुक व मुख्य गावास खुर्द असे पूर्वी संबोधले जाते असे. गावातील लोकसंख्या उपभागान मध्ये विभागली जाते .
तसेच जुने व नवे गाव असेही म्हणतात.तसेच काहीवेळा शेतकरी गावापासून दूर शेतात वस्ती करीत, अशा मोजक्या घरांच्या वस्तीला वाडी असेही म्हणतात.गावाकडे राहण्याची जी मजा असते ती मजा शहरात नाही मिळत .हिरवा निसर्ग ,गर्द झाडी ,स्वच्छ वाहणारा वारा हे सगळ गावातच मिळत .
Explanation
माझे गाव आहे . माझे गाव 'स्वच्छ गाव ' म्हणून ओळखले जाते . गावातील प्रत्येक जण आपले घर स्वच्छ ठेवतात. घराचा परिसर स्वच्छ ठेवतात. गावाची सुमारे 3000 लोकसंख्या आहे . माझ्या गावात प्रमुख व्यवसाय शेतकरी आहे . माझ्या गावात सर्वात जास्त मजूर आहे . माझ्या गावात लोहार ,धोबी ,न्हावी , गवळी लोक राहतात.
माझ्या गावात रस्ते दररोज झाडली जातात. जमा झालेला सुका कचरा कचरा गाडीत टाकतात.ओल्या कचऱ्याचे खत तयार करतात .रस्त्याच्या कडेला वड ,पिंपळ , कडुनिंब ,गुलमोहर ,जांभूळ यांची झाडे आहेत . काही वर्षांन पुर्वी गावात लोकांनी मिळून शेकडो रोप लावली होती . आज ते मोठी झालेली आहे. त्यामुळे सर्व गाव हिरवेगार आणि सुंदर दिसते. गावात गारवा असतो.
माझ्या गावात किराणा दुकान आहेत. गरजेच्या वस्तू दुकानांवर मिळतात. गावात प्राथमिक शाळा , हायस्कूल आहे. गावात दहावीपर्यंत शिक्षण होते. शाळेच्या आवारात हिरवीगार झाडे आहेत.
गावात दवाखाना आहेत. पोस्ट ऑफिस आहे .बस स्टॅन्ड जवळ ग्रामपंचायत आहे. माझ्या गावात श्रीकृष्ण मंदिर आणि महादेवाचे मंदिर आहे. गावाबाहेर हनुमान ची मंदिर आहे. गावापासून एक किलोमीटर अंतरावर धारेश्वर महादेवाचे मंदिर आहे . ते खूप प्रसिद्ध आहे . तेथे महाशिवरात्रीला येथे यात्रा भरते .
माझ्या गावातील लोक खूप मेहनती आहेत. ते मिळून जूळून राहतात . आणि गरजेच्या वेळी एकमेकांना मदत करतात.गावात सर्व घरांतील सांडपाणी बंद घरातून बाहेर सोडले जाते .गुरांचे शेण-मुत्र कंपोस्ट खड्ड्यात साठवले जाते आणि खत म्हणून त्याचा उपयोग करतात . त्यामुळे रोगराई पसरत नाही .
असे माझे स्वच्छ गाव मला खूप आवडते. खरच माझे गाव एक आदर्श गाव आहे.