प्र. ५) खालील प्रश्नाचे उत्तर सविस्तर लिहा. (को.१ )
१) ग्रामीण समुदाय व नागरी समुदाय यातील फरक खालील मुद्यांच्या आधारे लिहा.
.
अ) कुटुंब व्यवस्था ब) व्यवसाय क) आर्थिक स्थिती ड) प्रदूषण इ) शिक्षणाच्या सोईसुविधा
२) महिलांसाठी आरक्षण याबाबत सरकारने केलेल्या उपाययोजना लिहा.
plz help me
Answers
Answer:
अ) ग्रामीण समुदायातील लोक जास्तीत जास्त शेतीच्या कामावर अवलंबून असतात. शेतीकामात पुढे जाऊन हातभार भेटेल म्हणून कुटुंबात जास्त मुले असतात.
तर दुसरीकडे नागरी समुदायात कुटुंबात जास्त लोको नसतात कारण पुढे जाऊन जास्त खर्च होऊ नये याची काळजी घेतात.
ब) ग्रामीण समुदायात जास्तीत जास्त शेती कामे व छोटे छोटे व्यवसाय जसे बांधकाम, राशन दुकान, कपड्यांचे उद्योग, कापसाचे उद्योग असतात. दुसरीकडे नागरी समुदायात म्हणजे शहरात लोक मोठी इमारती चे बांधकाम तसेच कारखान्यात, मॉल मध्ये, जनरल स्टोअर मध्ये कामे करतात व कोण कोण स्वतःचे दुकान चालवतात .
क) ग्रामीण समुदायातील लोकांची आर्थिक स्थिती चांगली नसते.याचे मूळ कारण आहे त्यांचे अल्प शिक्षण व तेथील अविकसित अर्थव्यवस्था. दुसरीकडे नागरी समुदायातील लोकांची आर्थिक स्थिती ग्रामीण भागातील लोकांपेक्षा चांगली असते. याचे कारण तेथील मोठे कारखाने व दुसरे उद्योग तेथील अर्थव्यवस्था ही विकसित असते म्हणून तिथे जास्त कामासाठी लोकांची गरज असते.
ड) ग्रामीण समुदायातील लोक जास्त करून निसर्गावर अवलंबून असतात म्हणून त्यांना निसर्गाची काळजी व महत्त्वाची जाणीव असते म्हणून निसर्गाचे संरक्षण करतात व प्रदूषण टाळतात. दुसरीकडे नागरी नागरी समुदायात जास्त लोक राहतात म्हणून दिवस रात्र तेथे गाडी गाड्यांची ये-जा असते त्यामुळे तिथे प्रदूषणाचा खूप धोका असतो. मोठी मोठी घरे व कारखाने बनवण्यासाठी तिथे झाडे कापतात त्यामुळे तेथील पर्यावरण धोकादायक असतो.
इ) ग्रामीण भागात लोकसंख्या कमी असते म्हणून शिक्षण व्यवस्था फार चांगली नाही. रोजगारासाठी गावातील मुले शहरात जातात या कारणामुळे नागरी समुदायात जास्तीत जास्त विद्यापीठ शिक्षण संस्था उभारली आहेत.
Explanation:
wanna be frend dear??.......